Breaking-newsक्रिडा
गोलंदाजानेच केला धोनी-स्टाईल रन-आऊट
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बिग बॅश लीग स्पर्धेची धूम सुरू आहे. या स्पर्धेत मंगळवारी अॅडलेड येथे सिडनी थंडर्स वि. अॅडलेड स्ट्रायकर्स या संघात टी २० सामना झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पिटर सिडल याने केलेला रन-आऊट विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने फलंदाजाला धावबाद करताना ‘धोनी स्टाईल’ गडी माघारी धाडला आहे.