कुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/PTI6.jpg)
नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा पायउतार करून मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची झालेली निवड ही नियमांचे उल्लंघन करून झाली असल्याचे खळबळजनक विधान कार्यकारिणी समिती सदस्य डायना एडुल्जी यांनी केली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठा वाद उफाळू शकतो. विनोद राय यांनी महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक निवडण्यासाठी तयार केलेल्या समितीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना ईमेलमध्ये त्यांनी असे लिहले आहे.
लोढा समितीच्या शिफारशीनुसार, बीसीसीआयच्या कार्यप्रणालीवर देखेरेख ठेवण्यासाठी लोढा सर्वोच्च न्यायालयाने चार सदस्यीय कार्यकारणी समिती स्थापन केली होती. त्यात रामचंद्रा गुहा, विक्रम लिमये, विनोद रॉय आणि डायना एडुल्जी आहेत. मागील वर्षी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील अंतर्गत वादांमुळे अनिल कुंबळे यांना मुख्य प्रशिक्षक पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यांच्याजागी रवी शास्त्री यांची वर्णी लागली होती.
विराट हा सतत बीसीसीआयचे सचिव राहुल जोहरीना मेसेज करून अनिल कुंबळे यांच्याविषयी तक्रार करायचा. त्यामुळे बीसीआयने कुंबळेना सांगितले की, कर्णधारला तुमची मार्गदर्शनाचीची पद्धत आवडत नाही आणि भारतीय संघाला याचा विशेष फायदा होणार नाही. हेच कुंबळे यांचा कार्यकाळ संपण्याआधी राजीनामा देण्याचे मुख्य कारण होते, असे डायना एडुल्जी यांनी सांगितले आहे.
कार्यकारिणी समितीने महिला प्रशिक्षक निवडण्यासाठी तीन सदसिया समिती स्थापण करण्याच्या निर्णय त्यांना अवडलेला नाही. त्याचबरोबर भारतीया महिला संघाची टी -20 कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उप कर्णधार स्म्रिती मंधाना यांनी रमेश पोवार यांना पुन्हा प्रशिक्षक नेमावे असा आग्रह केला आहे.
त्यावर एड्जली या देखील त्याच विचारातील आहेत तर विनोद राय यांच्यानुसार खेळाडूंना प्रशिक्षक नेमण्याचा अधिकार नाही.पुढे त्याने लिहले आहे की, क्रिकेट ऍडवाजरी समितीच्या निर्णयाचा अवमान करून विराटने कुंबळे यांना पदउतार करण्यात मोठी भूमिका बजावली होती. जर संघाच्या हिताचे असेल तर या दोन भारतीय महिला खेळाडूंच्या निर्णयाचा आदर का करू नये ? असे ही त्यांनी राय यांना इमेलमध्ये लिहले आहे.
पुढे त्या म्हणाल्या, अनेकवेळा अर्ज भरण्यात उशिर करूनही काही खेळाडूंना अर्ज भरण्याची मुभा दिली गेली आहे, त्याचा मी निषेद करते. अनिल कुंबळे हे बरोबर असूनही त्यांना चुकीच्या पद्धतीने डालवले गेले आहे परंतु, त्यांनी याचा काही निषेद केला नाही आणि आपला नवीन मार्ग स्वीकारला. त्याचबरोबरबरा अनेक नियम मंडले गेले आहेत आणि मी त्या- त्या वेळी याबाबत निषेध व्यक्त केला आहे.