कायलन एमबापे ठरतोय फूटबॉल मधिल नविन स्टार
अर्जेंटिना आणि पोर्तुगालसह लिओ मेस्सी आणि रोनाल्डोची विश्वचषकातून गच्छंती. गत विश्वविजेत्यांपाठोपाठ विद्यमान युरोविजेतेही बाहेर गेले. खरोखरच या दोन सुपरस्टार्सचा अस्त झाला असून पुढचा विश्वचषक येईल, तेव्हा हे दोघेही पस्तीशीच्या पलीकडे गेलेले असतील, त्या मुळे फूटबॉलच्या मैदानात चमकनाऱ्या या स्टार्सची जागा आता कोण घेइल असा प्रश्नही उपस्थीत होत आहे, मात्र त्याला कायलन एमबापेच्या रुपाने सध्यातरी एक पर्याय फूतबॉल विश्वाला दिसत आहे.
अर्जेंटिनाचा लियोनाल मेस्सी आता 31 वर्षांचा आहे तर पोर्तुगालचा ख्रिस्तीयाने रोनाल्डोहा 33 वर्षांचा झाला आहे त्यामुळे आगामी काही दिवसाम्मध्ये हे दोघेही आपली निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे, त्यामुळे सध्या फूटबॉल विश्वाला एका नव्या नावाची आणि चेहऱ्याची गरज होती ही गरज फ्रान्सच्या कायलन एमबापेच्या रुपाने पुर्ण होताना दिसून येत आहे.
लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाला बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर फ्रान्समधील प्रत्येकाच्या तोंडावर सध्या एकच नाव आहे, ते म्हणजे किलियान एम्बापे. 19व्या वर्षीच एम्बापेला मोठी प्रसिद्धी मिळत आहे.
उप-उपांत्यपूर्व फेरीत त्याने अर्जेंटिनाविरुद्ध दोन गोल केले. तत्पूर्वी, साखळीत पेरूविरुद्ध एक गोल केला. फ्रान्सचा नवा सुपरस्टार म्हणून त्याच्याकडे बघितले जात आहे. अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात 19 वर्षीय कायलन एमबापेने “तुफानी’ खेळाचे प्रात्यक्षिक दाखवले. त्याच्या या कामगिरीमुळे ब्राझीलचा महान खेळाडू पेले याच्या विक्रमाला त्याने टक्कर दिली. कायलिन एमबापे फिफा विश्वचषकाच्या एका सामन्यात दोन गोल करणारा पेलेनंतरचा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. त्यामुळे त्याच्याकडे भविष्यातील स्टार खेळाडू म्हणुन पाहिले जात आहे.
एम्बापेने फुटबॉलचे प्राथमिक धडे घरातच आपल्या वडिलांकडून गिरविले. त्याची आईदेखील हॅंडबॉल खेळायची. त्यामुळे घरातूनच त्याला खेळाला पोषक वातावरण मिळाले. वयाच्या सहाव्या वर्षीच तो फ्रान्समधील सर्वोत्कृष्ट लहानगा फुटबॉलपटू ठरला होता. फुटबॉलची दैवी देणगी घेऊनच तो जन्माला आला आहे, असे त्याचे वडील नेहमी म्हणत. आपल्या गुणवत्तेला पैलू पाडण्यासाठी एम्बापेने फ्रान्सचे राष्ट्रीय फुटबॉल सेंटर असलेले क्लिअरफाउंटन गाठले. त्याच्यातील प्रतिभेने लवकरच या सेंटरचा तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. त्या वेळी त्याचा आवडता क्लब होता रियल माद्रिद.
मात्र, अनेक क्लबची चाचपणी केल्यानंतर त्याने आपली क्लब कारकीर्द सुरू केली ती मोनॅको क्लबकडून. त्या वेळी त्याच वय होते 16 वर्षे 347 दिवस. “दी सेकंड प्रिन्स ऑफ मोनॅको’ या टोपण नावाने एम्बापे ओळखला जातो. त्याची फुटबॉलची शैली ही फ्रान्सच्या थिएरी हेन्रीशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे थिएरीशी त्याची नेहमीच तुलनाही केली जाते. पण, आता एम्बापेला स्वत:ची ओळख मिळाली आहे. त्याच्यात शेवटपर्यंत हार न मानण्याची वृत्ती आहे. चेंडूवर ताबा मिळताच, सुसाट सुटायचे किंवा सहकाऱ्याकडे अचूक पास द्यायचा, यात एम्बापे आता चांगलाच तरबेज झाला आहे. एम्बापेचे ख्रिस्तियानो रोनाल्डोसहचे एक चित्र सध्या सोशल मीडियावर फिरते आहे. त्या वेळी एम्बापे अगदीच लहान होता. आता तोच एम्बापे रोनाल्डोसारख्या अव्वल खेळाडूंसारखी गुणवत्ता बाळगून असल्याची चर्चा तज्ज्ञांमध्ये सुरू झाली आहे.