कपिल देव होण्याची इच्छा नाही… हार्दिक पांड्याचे धक्कादायक विधान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/pandya265_201808121842.jpg)
मुंबई: मला हार्दिक पांड्याच असुद्या, त्यातच मी समाधानी आहे, भारतीय गोलंदाज हार्दिक पांड्याने व्यक्त केलेल मत. इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर पांड्या बोलत होता. अन्य क्रिकेटपटूशी केलेली तुलना त्याला नको हवी होती.
पांड्याने ट्रेंट ब्रिज कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला. अवघ्या २९ चेंडूंत त्याने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना माघारी पाठवले आणि कसोटी कारकिर्दीत त्याने प्रथमच पाच गडी टिपले. तिसऱ्या कसोटीत भारताने २९२ धावांची आघाडी घेतली आहे आणि आठ फलंदाज अजून शिल्लक आहेत. या मालिकेत ८ विकेटसह पांड्या भारताचा दुसरा यशस्वी गोलंदाज आहे. त्याची तुलना नेहमी भारताचे दिग्गज कपिल देव यांच्याशी केली गेली आहे.
” तुम्हीच सतत तुलना करत असता आणि माझी कामगिरी साजेशी झाली नाही की पांड्या कपिल देव यांच्यासारखा नाही, असेही तुम्हीच म्हणता. मला कपिल देव कधीच व्हायचे नव्हते. मला हार्दिक पांड्याच राहुद्या. मी कपिल देव म्हणून नाही तर पांड्या म्हणून ४० वन डे आणि १० कसोटी सामने खेळलो आहे. त्यामुळे तुलना करणे थांबवा, ” अशी विनंती पांड्याने केली.