इशांत आणि जडेजा मैदानात भिडले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/jadeja-and-ishan-sharma-.jpg)
पर्थ- विराट कोहली आणि टीम पेन यांच्यातील वादावादीनंतर चौथ्या दिवशी झालेल्या ड्रिंक्स ब्रेकमध्ये रवींद्र जाडेजा आणि इशांत शर्मा यांच्यात वादावादी झाली असून त्यांच्या मध्ये झालेल्या वादाचे नेमके कारन अद्याप समजले नाही.
पर्थ येथील दुसऱ्या कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डाव सुरु असताना भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्मा आणि बदली क्षेत्ररक्षक म्हणून अलेला रविंद्र जडेजा यांच्यात वादावदी झाली.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावादरम्यान पाणी पिण्यासाठी खेळ थांबवण्यात आला होता. त्यावेळी खेळपट्टीजवळ इशांत शर्मा आणि रविंद्र जडेजा यांच्यात वाद झाला. या वादचे कारण समजू शकले नाही. पण, व्हिडिओवरुन हे दोघे एकमेकांवर प्रचंड नाराज असल्याचे दिसत होते. शेवटी वाद वाढत असल्याचे पाहून मोहम्मद शमी आणि पाणी घेऊन आलेला कुलदीप यादव यांनी या दोघांना एकमेकांपासून दूर नेत हा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांतील खेळाडू एकमेकांना स्लेजिंग करताना दिसले. परंतु, भारतीय संघातीलच खेळाडू आपासातच वाद घालत असल्याच्या व्हिडीयोने क्रिकेट चाहते नाराज झाले आहेत.