Breaking-newsआंतरराष्ट्रीयक्रिडा
आशियाई स्पर्धा २०१८ : सायना नेहवालने पटकाविले कांस्यपदक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/Saina-Nehawal-1.jpg)
जकार्ता – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा २०१८ स्पर्धांमध्ये आज नवव्या दिवशी भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला उपांत्यफेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. सायनाचा चीन ताइपयेच्या ताई जु के हिने १७-२१,१४-२१ अशा सेटने पराभव केला आहे.
उपांत्यफेरीच्या सामन्यात झालेल्या या पराभवामुळे सायना हिला वैयक्तिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. आता आशियाई स्पर्धेच्या नवव्या दिवशी अॅथलेटिक्सआणि बॅडमिंटनमध्ये पी.व्ही.सिंधू हिच्या प्रदर्शनावर सर्वांची नजर असणार आहे.
भारताची स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आज उपांत्यफेरीचा सामना खेळणार आहे. यापूर्वी म्हणजे आठव्या दिवशी भारताने अॅथलेटिक्स मध्ये ३ आणि घोडेस्वारीमध्ये दोन रौप्यपदक जिंकले आहेत.