Breaking-newsक्रिडा
आशियाई स्पर्धा : दिपीका पल्लीकलला स्क्वॉशमध्ये कांस्यपदक

जकार्ता – इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या १८ व्या आशियाई स्पर्धेत आज सातव्या दिवशी शनिवारी भारताच्या खात्यात आणखी एका पदकांची भर पडली आहे. स्क्वॉश या क्रीडाप्रकारात दिपीका पल्लीकल हिने कांस्यपदक पटकाविले आहे.
स्क्वॉश या क्रीडाप्रकारातील महिला एकेरीत उपांत्य फेरीत दिपीका पल्लीकल हिचा मलेशियाच्या निकोल डेविड हिने 0-3 अशा गुणाफरकाने पराभव केला. निकोलने दिपीकावर ७-११, ९-११, ६-११ अशा ३ सरळ सेट्समध्ये मात करत विजय मिळविला. त्यामुळे दिपीकाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.







