breaking-newsक्रिडा

आशियाई विजेत्या इराकला भारतीय युवकांचा धक्‍का

कोणत्याही गटांत इराकवर पहिला विजय 

अम्मान: अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात “इंजुरी टाईम’मधील गोलच्या जोरावर विद्यमान आशियाई विजेत्या इराकचा 1-0 असा रोमांचकारी पराभव करताना भारताच्या 16 वर्षांखालील फुटबॉल संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. कोणत्याही स्पर्धेत आणि कोणत्याही वयोगटांत भारताने इराकचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

भारतीय युवक संघाने या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात बलवान जॉर्डनचा 4-0 असा आश्‍चर्यकारक पराभव करताना सनसनाटी प्रारंभ केला होता. तीच मालिका कायम राखताना भारतीय युवकांनी गेल्या सामन्यांत जपानविरुद्ध लक्ष्यवेध करताना विक्रमी कामगिरी केली होती. भारताचा जपानवर गेल्या 36 वर्षांतील हा पहिला गोल ठरला. इराकविरुद्ध संपूर्ण सामन्यात जिद्दीने खेळ केला. भारताने मध्यंतरापर्यंत इराकला गोलशून्य बरोबरीत रोखले, तेव्हाच खळबळजनक निकालाची चाहूल लागली होती. परंतु भुवनेशने जागा वेळेत अप्रतिम हेडरवर निर्णायक गोल नोंदवीत भारताच्या इराकवरील ऐतिहासिक विजयाची निश्‍चिती केली.

भुवनेशने लक्ष्यवेध करताच सर्व भारतीय खेळाडू त्याच्याकडे धावले व त्यांनी विजय साजरा केला. भारत व इराक यांची याआधी नेपाळमध्ये झालेल्या एएफसी स्पर्धेत गाठ पडली होती. त्या वेळी भारताने इराकला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. आज त्याही पुढे पाऊल टाकताना भारताने इराकवर पहिल्या विजयाची पूर्तता केली.

हा विजय भारतीय संघाच्या सर्व गटांमधील प्रशिक्षकांच्या मेहनतीचा असल्याचे सांगून भारतीय प्रशिक्षक बिबियानो फर्नांडिस म्हणाले की, त्यांनी एआयएफएफ अकादमीत आम्हाला बहुमोल मार्गदर्शन केले. भारतीय खेळाडूंना या सगळ्याच खूपच फायदा झाला आहे. आता भारतीय खेळाडूंनी दुखापती टाळण्याची गरज आहे, तरच आम्हाला ही कामगिरी कायम राखता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button