breaking-newsक्रिडा

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिस स्टार सुमीत नागलचे आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली – अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपले. दुसऱ्या फेरीत त्याची लढत ऑस्ट्रियाचा डोमिनिक थीएम याच्याशी होती. डोमिनिक थीएमने ६-३, ६-३, ६-२ असा नागलचा सहज पराभव केला. जागतिक क्रमवारीत १२४व्या क्रमांकावर असलेला भारताचा टेनिस स्टार सुमित नागल याने अमेरिकन ओपन स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील सामना जिंकून सर्वांना धक्का दिला होता. अमेरिकेच्या ब्रॅडली क्लॅनला नमवून त्याने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता.

गेल्या सात वर्षात ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात दुसऱ्या फेरीत पोहोचणारा सुमीत हा पहिलाच भारतीय ठरला. सुमितच्या आधी २०१३ साली सोमदेव देववर्मनने विजय मिळवला होता. विशेष म्हणजे २३ वर्षीय सुमितने २०१९च्या अमेरिकन ओपन स्पर्धेत सर्वांना हैराण केले होते. तेव्हा त्याने २० वेळा ग्रँड स्लॅम विजेता असलेल्या रॉजर फेडररविरुद्धच्या पुरुष एकेरीत ४-६ असा एक सेट जिंकला होता. त्यावेळी फेडररनेदेखील सुमितच्या खेळाचे कौतुक केले होते. मात्र नंतरच्या तीनही सेटमध्ये नागलला पराभव स्वीकारावा लागला होता. यंदाही दुसऱ्या फेरीत त्याचा दमदार प्रवेश झाला, मात्र थीएमच्या अनुभवापुढे नागलचा संघर्ष फिका पडला.

हरियाणातील झज्जर येथे १६ ऑगस्ट १९९७ रोजी जन्मलेल्या सुमितने २०१५ साली विम्बल्डनच्या दुहेरीचे विजेतेपद मिळवले होते. तेव्हा तो सर्वप्रथम चर्चेत आला होता. महेश भूमतीने स्वत:च्या अकादमीमध्ये त्याला प्रशिक्षण दिले आहे. त्यानंतर त्याला जर्मनीत टेनिसचे प्रशिक्षण मिळाले. कोरोनामुळे तो जर्मनीत अडकला होता. या वेळेचाही त्याने सदुपयोग केला. जर्मनीत थांबल्यानंतर तेथील साश्चा नेन्सेल अकादमीत त्याने आपला सराव सुरूच ठेवला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button