Breaking-newsक्रिडा
अखेर ‘युवराज सिंग’ मुंबईकर !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/1484881210_yuvraj-sin.jpg)
काल इंडियन प्रीमियर लीग 2019 साठी खेळाडूंची बोली प्रक्रिया जयपूर येथे पार पडली. या लिलावात सर्वात आश्चर्यकारक बोली ही युवराज सिंगची ठरली. पहिल्या फेरीमध्ये एकाही संघाने युवराज सिंगसाठी बोली लावली नाही. यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक बामती ठरली होती.
मात्र दुसऱ्या फेरीत युवराज सिंगला मुंबई इंडियन्सने खरेदी केले. युवराज सिंगची मूलभूत किंमत ही 1 कोटी होती. मुंंबई इंडियन्सने देखील त्याला 1 कोटीमध्येच खरेदी केले. मुंबई इंडियन्स सोडून एकाही संघाने युवराज साठी बोली लावली नाही.
मागील वर्षी युवराज सिंग किंग्स इलेव्हन पंजाब संघातून खेळला होता. यावेळी त्याला करारातून मुक्त केले. एकेकाळी 16 कोटींची बोली लागलेल्या युवराज सिंगला 1 कोटींची बोली लागल्याने अनेकांनी आश्चर्यव्यक्त केले. मागील वर्षी युवराजने आठ डावांमध्ये केवळ 65 धावा केल्या होत्या.