ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बाल सोबत लग्न करणार

सोनाक्षीच्या लग्नामुळे तिचे आई वडील नाराज असल्याची चर्चा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा ही लवकरच लग्न करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोनाक्षी सिन्हा ही झहीर इक्बाल याला डेट करत आहे. आता सोनाक्षी सिन्हा ही झहीर इक्बाल याच्यासोबतच लग्न करणार आहे. मात्र, सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नामुळे तिचे आई आणि वडील नाराज असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. सोनाक्षी सिन्हा हिने बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. सोनाक्षी सिन्हाने अनेक हिट चित्रपट दिली आहेत. सोनाक्षी सिन्हा हिचा मोठा चाहतावर्गही बघायला मिळतो.

सोनाक्षी सिन्हा हिच्या झहीर इक्बाल याच्यासोबतच्या लग्नाच्या निर्णयानंतर तिचे कुटुंब चांगलेच नाराज असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हेच नाही तर सोनाक्षीच्या लग्नाच्या निर्णयानंतर तिची आई देखील तिच्यावर नाराज असल्याचे दिसतंय. सोनाक्षीची आई पूनम सिन्हा या सोशल मीडियावर फक्त सहा लोकांना फॉलो करतात. हैराण करणारे म्हणजे पूनम सिन्हा या सोनाक्षी सिन्हा हिला फॉलो करत नाहीत.

हेच नाही तर सोनाक्षी सिन्हा हिला आईच नाही तर तिचा भाऊ लव सिन्हा हा देखील सोशल मीडियावर फॉलो करत नाही. सोनाक्षी सिन्हा ही इन्स्टाग्रामवर 400 लोकांना फॉलो करते. ज्यामध्ये तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि दुसरा भाऊ कुश सिन्हा हा आहे. सोनाक्षी सिन्हा देखील भाऊ लव याला सोशल मीडियावर फॉलो करत नाही. यावर अशी एक चर्चा तूफान रंगताना दिसतंय की, सोनाक्षीच्या लग्नामुळे कुटुंबात वाद सुरू आहेत.

शत्रुघ्न सिन्हा हे नाराज असल्याचा दुजोरा देखील मिळाला. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल काही वर्षांपासून डेट करत आहेत. झहीर इक्बाल आणि सोनाक्षी नेहमीच एकसोबत स्पॉट होताना दिसतात. झहीर इक्बाल याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हा पोहचली होती. ज्याचे फोटो व्हायरल होताना दिसले.

यावेळी सोनाक्षी सिन्हा ही झहीर इक्बाल याच्या कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवताना दिसली. सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावरही सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी सिन्हा दिसते. सोनाक्षी सिन्हा हिचा काही दिवसांपूर्वीच डबल एक्सएल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे हा चित्रपट धमाका करताना देखील दिसला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button