TOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

त्वचा कोरडी पडते, खाज येते…आंघोळीच्या पाण्यात फक्त एक चमचा तूप मिसळा, ‘हे’ फायदे

हिवाळ्यात प्रत्येकालाच आपल्या त्वचेची काळजी असते. कारण या मोसमात त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्वचा कोरडी पडते, खाज येते अशा अनेक समस्या उद्भवतात. या समस्येवर एकच उपाय आहेत. आणि हा रामबाण आहे. तो म्हणजे अंघोळी करताना कोमट पाण्यात तुप मिसळल्यास, त्वचे संबंधित अनेक समस्या होतील दुर. 

डोकेदुखीच्या समस्या दुर 

जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास आहे, तर कोमट पाण्यात तूप टाकून या समस्येपासून लवकरच सुटका मिळू शकते. 

खाजेच्या समस्येपासून सुटका 

कोमट पाण्यात तूप टाकून आंघोळ केल्याने त्वचेला कोरडेपणा तर मिळतोच पण खाज येण्याच्या समस्येपासूनही खूप आराम मिळतो. या पद्धतीचा अवलंब केल्यास तुम्ही सर्वांसमोर पूर्णपणे फ्रेश दिसाल.

ब्लड सर्कुलेशन चांगले होते 

कोमट पाण्यात तूप मिसळून अंघोळ केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. असे केल्याने थंडीच्या वातावरणात शरीराचे तापमान राखले जाते आणि सर्व प्रकारच्या आजारांपासून तुमचे रक्षण होते.

त्वचा कोरडी पडत नाही 

हिवाळ्यात त्वचेच्या कोरडेपणाची समस्या खूप सतावते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कोमट आंघोळीच्या पाण्यात तूप मिसळा. याने त्वचेला मॉइश्चरायझेशनही मिळेल आणि कोरडेपणापासूनही बचाव होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button