breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपुणे

धक्कादायक! तर, पुन्हा होऊ शकतो करोनाचा संसर्ग – टास्क फोर्स

पुणेः राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत चिंता व्यक्त केली जात असताना राज्याच्या कोविड टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शहरात आता जे रुग्ण सापडत आहेत त्यांना पुन्हा करोनाची लागण झाली आहे असे रुग्ण आहेत. तसंच, अगदीच मागील महिन्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेत लागण झालेल्या रुग्णांना पुन्हा करोनाचा संसर्ग होत आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी जवळपास ४० टक्के रुग्णांना पुन्हा करोनाचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती नोबेल रुग्णालयातील डॉ. अमित द्रविड यांनी म्हटलं आहे.

तिसऱ्या लाटेत ओमिक्रॉन व्हेरियंटने धुमाकुळ घातला होता. त्यामुळं तिसऱ्या लाटेत ज्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला होता त्यांना आता पुन्हा BA.4 आणि BA.5ची लागण होत आहे. कारण करोनाच्या या दोन्ही उपप्रकाराचे L452R आणि F486V मध्ये म्युटेशन होत गेले. L452R आणि F486Vमध्ये म्युटेशन झाल्यामुळं व्हायरस रुग्णाच्या रोगप्रतिकार शक्तीवर थेट हल्ला करतो, असे संशोधनात दिसून आले आहे.

राज्यात, BA.4 आणि BA.5 या व्हेरियंटचे १३ रुग्ण सापडले आहेत. या दोन्ही उपप्रकारामुळं रुग्ण संख्या वाढत असल्याचा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आत्तापर्यंत २० टक्के रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेंससाठी पाठवले आहेत. तेव्हा BA.2.121.1 आणि BA.4 व्हेरियंट आढळला आहे. सध्याच्या अनेक नमुन्यांमध्ये हे सबव्हेरिएंट्स जास्त टक्केवारीत असण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले. कोविड संसर्ग किंवा लसीकरणानंतर सहा महिन्यांनी प्रतिकारशक्ती कमी होते. परंतु ही स्थिती बहुतेक सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्ये होते. तिसर्‍या लाटेदरम्यान सौम्य कोविड झालेल्या अनेकांना करोनाचा पुन्हा संसर्ग होऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. परीक्षित प्रयाग म्हणाले, “आमच्याकडे नुकत्याच झालेल्या रीइन्फेक्शन प्रकरणांपैकी जवळपास ८०% रुग्णांना पहिल्या लाटेत कोविडची लागण झाली होती. उरलेल्या २०% रुग्णांना ओमिक्रॉन लाटेदरम्यान संसर्ग झाला होता आणि आता, दुस-यांदा ही प्रकरणे समोर आली आहेत. बूस्टर किंवा लसीचा डोस न घेतलेले रुग्णांची संख्या अधिक आहे. देशातील काही राज्यांत BA.4/5 व्हेरियंट सापडले आहेत. परंतु करोनाचा पुन्हा संसर्ग झालेले रुग्ण गंभीर होण्याची शक्यता कमी आहे, असं डॉ. संजय पुजारी यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button