breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘शिवाजी महाराज आधुनिक भारताच्या नौसेनेचे जनक’; शंकर जगताप

नौसेना दलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा लावण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचे शहर भाजपतर्फे स्वागत

पिंपरी : ६ डिसेंबर २०२३: स्वतंत्र भारताच्या इतिहासात गेली सत्तर वर्षे आपल्या सशस्त्र सेनांचे दिवस दिल्लीतील एखाद्या लॉनवर साजरे होत असत. गेल्या सत्तर वर्षात प्रथमच एक पंतप्रधान आपल्या नौसेना दिवस साजरा करण्यासाठी सिंधुदर्गावर आले. मध्ययुगाच्या पूर्ण गुलामगिरीच्या इतिहासात एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होते, ज्यांनी आरमाराचे महत्त्व ओळखले होते. ज्याच्याकडे आरमार त्यांची समुद्रावर सत्ता, त्या राज्याचे समुद्रकिनारे बळकट, आणि अंतिमतः जगाच्या व्यापाराचे दरवाजे त्या राज्याचे खुले होतात. असा सर्व विचार करून शिवाजी महाराजांनी स्वतःचे आरमार उभे केले. त्या अर्थाने शिवाजी महाराज हे आधुनिक भारताच्या नौसेनेचे जनक ठरतात, असे मत पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केले.

६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सकाळी ९ वाजता परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नौसेना दलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा लावण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा एच.ए. कॉलनी पिंपरी अशी पायी रॅली काढण्यात आली. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण व अभिवादन कार्यक्रम पार पडला, त्यावेळी शंकर जगताप बोलत होते.

शंकर जगताप पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांचे कार्य ओळखून नौसेनेच्या ध्वजावर शिवाजी महाराजांच्या मुद्रेवरून प्रेरणा घेऊन नवीन मुद्रा लावण्यात आली होती. आता नौसेनेच्या प्रत्येक सैनिकाच्या गणवेशावर आता शिवाजी महाराजांची मुद्रा असणार आहे. गुलामगिरीचे प्रतीक असलेली ब्रिटिशधार्जिणी मुद्रा आता भारतीय सैनिक वागवणार नाही. गेले सत्तर वर्षे स्वतंत्र भारताची नौसेना गुलामगिरीचे प्रतीक असलेल्या ध्वजाला वंदन करत होती. मोदी सरकारने हे एक गुलामगिरीचे प्रतीक नष्ट करून देशवासियांना आणि नौसेनेलाही अभिमान वाटेल असा हा बदल करून दाखवला. आधुनिक भारताच्या नौसेनेचे जनक म्हणून शिवाजी महाराजांचा गौरव करणारे मोदी सरकार हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातले पहिले सरकार आहे. आधुनिक भारताची नौसेना या कोकणाच्या भूमीत, या महाराष्ट्राच्या भूमीत निर्माण झाली, असे म्हणून मोदीजींनी या भूमीलाही वंदन केले.

यावेळी, विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दूर्गे, सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, अजय पाताडे, शैला मोळक, पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे, चिंचवड विधानसभा प्रमुख काळूराम बारणे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, मंडल अध्यक्ष प्रसाद कस्पटे, संतोष निंबाळकर, निलेश अष्टेकर, रवींद्र नांदुरकर, संतोष तापकीर, कविता हिंगे, तेजस्वीनी कदम, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, अंबरनाथ कांबळे, सागर आंगोळकर, माउली थोरात, माजी नगरसेविका शर्मिलाताई बाबर, निर्मला कुटे, आरती चौंधे, उषा मुंढे, अनुराधा गोरखे, शारदा सोनवणे, सविता खुळे, अनुसुचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस धनराज बिरदा, उपाध्यक्ष बिभीषण चौधरी,‍ भीमा बोबडे, वैशाली खाडये, आशा काळे, राजश्री रायभाय, अभिजित बोरसे, शेखर चिंचवडे, गोपाळ मंडल, जयेश चौधरी, सुधीर साळुंखे, संदीप गाडे, प्रसाद कस्पटे, वीणा सोनवलकर, दीपक भंडारी, राजन गुंजाळ, गणेश ढाकणे, प्रीती कामतिकर, विजय शिनकर, राधिका बोरलीकर, विजय भिसे, सिध्देश्वर बारणे, सागर फुगे, रवि देशपांडे, ऍड. दत्ता झुळूक, गणेश वाळुंजकर, प्रकाश जवळकर, महेंद्र बाविस्कर, शाकीर शेख, नेताजी शिंदे, पल्लवी मारकड, मुकेश चुडासमा, कोमल शिंदे, मधुकर बच्चे, बाळासाहेब भुंबे, गोपाळ माळेकर, कमल मलकानी, ऍड. गोरक्षनाथ झोळ, अलका मकवाना, प्रतिभा जवळकर, सोनाली शिंपी, गोरख पाटील, देवदत्त लांडे, संजय परळीकर आदी उपस्थित होते. यांच्यासह सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, माजी नगरसेवक, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, वॉरियर्स, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

कालच्या नौसेनेच्या प्रात्यक्षिकांमध्ये एका युद्धनौकेचे नेतृत्व एका महिलेच्या हातात होते. मोदी सरकारने महिला सक्षमीकरणासाठी जितक्या गोष्टी केल्या आहेत, तितक्या गेल्या सत्तर वर्षात कोणी केल्या नसतील. आणि मोदीजी आपल्या भाषणात म्हणाले देखील की नौसेनेमध्ये सुद्धा नारी शक्तीला प्रोत्साहन देणे ही आमची प्राथमिकता आहे.

शंकर जगताप, शहराध्यक्ष –भाजपा, पिंपरी चिंचवड शहर 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button