breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“शिवसेनेनं मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी” : नितीन देशमुख

मुंबई । प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील मावळ मतदार संघातील जागा ही शिवसेने पार्थ पवार यांच्यासाठी सोडून मनाचं मोठेपण दाखवावं अशी मागणी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी केली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते पार्थ पवार यांचा 21 मार्च रोजी वाढदिवस असल्याने नितीन देशमुख यांनी त्यांना शुभेच्छा देणारी पोस्ट फेसबुकवर लिहीली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, २०१९ साली त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरु केली. साहजिकच त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीवर माध्यमांची नजर होती. भाजपचा आयटी-सोशल मीडिया विभाग देखील त्यांच्याविरोधात कमालीचा सक्रीय दिसला. पार्थदादा यांना नामोहरण करण्यासाठी जणू भाजपचा आयटी सेल फडणवीस पेक्षाही पार्थदादांवर जास्त नजर ठेवून होता.एकच उदाहरण सांगतो, मतदारसंघातील एका देवळात पार्थदादा बुट बाहेर काढून आवारात गेले. तरिही त्यांच्या मोज्यांना बुट असल्याचे भासवून खोटा प्रचार केला गेला.

तसेच त्यांचे महाविद्यालयीन काळातील खासगी फोटो नेमक्या मतदानाच्या काही दिवस आधीच लिक करण्यात आले होते. महाराष्ट्रात आजवर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला इतक्या खालच्या पातळीचा प्रचार झाला नव्हता. तो पार्थदादांच्या पराभवासाठी करण्यात आला. कारण काय? तर पार्थ अजित पवार पराभवात विरोधकांना शरद पवार साहेब, अजितदादा पवार यांचा पराभव दिसत होता. पण शेवटी पार्थ अजित पवार हे पवार आहेत, ते उसळून येणारच. याचं विरोधकांना भान नाही.

पार्थ अजित पवार मावळच्या निवडणुकीनंतर थांबले नाहीत. पार्थ पवार फाऊंडेशन या संस्थेच्या मार्फत मावळमधील आदिवासी भागात चांगलं काम सुरु आहे. कोविड काळातही आदिवासी पाड्यावर जाऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पार्थ अजित पवार यांची मदत पोहोचवली होती. दोन जिल्ह्यात पसरलेला सर्वात अवघड लोकसभा मतदारसंघ म्हणून मावळची ओळख आहे. एकाचवेळी पश्चिम किनारपट्टी आणि पश्चिम घाटी असलेल्या या मतदारसंघात अनेक सामाजिक घटक राहतात. त्या सर्वांचे प्रश्न समजून घेत पार्थ अजित पवार २०१९ पासून प्रसिद्धीच्या झोतात न येता, आपलं काम करत आहेत. पुढील निवडणुकीत याचा प्रत्यय महाराष्ट्राला आल्याखेरीज राहणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे संसदरत्न खासदार आहेत. त्यांच्या कामाची चुणूक आपण सर्वांनीच पाहिली आहे. महाविकास आघाडीने ठरविल्याप्रमाणे पुढील निवडणूक आघाडी लढणार आहे. त्यामुळे मावळची जागा ही पार्थ अजित पवार यांना देऊन बारणे यांना महाविकास आघाडीने राज्यसभेत पाठवावे. २००५ साली जेव्हा सन्माननीय सुप्रीयाताई राज्यसभेसाठी उभ्या राहिल्या होत्या, तेव्हा हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेबांनी मा. सुप्रियाताईंना बिनशर्त पाठिंबा दिला होता. आज तोच दिलदारपणा माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी दाखवावा, असे माझ्या सारख्या एका सामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वाटते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button