breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन

७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Anil Babar Passed Away : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर  यांचे आज आकस्मिक निधन झाले. मृत्यूसमयी ते ७४ वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील आटपाडी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. न्यूमोनियाचे निदान झाल्यानंतर त्यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार बाबर एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले होते. महाविकास आघाडीवर त्यांनी जोरदार टीका करत शिंदे गटाला साथ दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.

शिंदे आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते तेव्हापासूनच आमदार बाबर त्यांच्या सोबत होते. आमदारांच्या अपात्रता प्रकरणात ठाकरे गटाने जी नावं दिली होती त्यात बाबर यांचेही नाव होते. सन २०१९ मध्ये शिवसेनच्या चिन्हावर निवडून आले होते. सदाशिव पाटील या अपक्ष उमेदवाराचा पराभव त्यांनी केला होता. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या १९ व्या वर्षापासूनच राजकारणाला सुरुवात केली होती. सर्वात आधी खानापूर तालुक्यातील गर्दी गावचे सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १९९०, १९९९, २०१४ आणि २०१९ या चार विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रात ‘या’ तारखेपर्यंत गारठा, हवामान विभागाने दिला इशारा

७ जानेवारी १९५० रोजी अनिल बाबर यांचा जन्म झाला. १९७२ साली त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. सर्वात आधी १९९० मध्ये त्यांना आमदारकीची संधी मिळाली होती. १९८२ ते १९९० या आठ वर्षांच्या काळात खानापूर पंचायत समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.

टेंभू योजना पूर्णत्वास नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. याआधी मागील वर्षात त्यांच्या पत्नी शोभा बाबर यांचे निधन झाले होते. त्यानंतर सहाच महिन्यात अनिल बाबर यांचेही निधन झाले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही सरपंच ते आमदार असा त्यांचा राजकीय जीवनातील प्रवास राहिला. त्यांच्या आकस्मिक निधनाने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पाणीदार आमदार अशी त्यांची ओळख आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघ दुष्काळी म्हणून गणला जातो. या भागात जायकवाडी धरणातील पाणी आणता येईल यासाठी बाबर यांनी नेहमीच प्रयत्न केले. यासाठी त्यांनी टेंभू योजना पूर्णत्वास नेण्यासाठी मोठा पाठपुरावा केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button