breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Shigela: केरळला ‘शिगेला’चा धोका; ८ रुग्ण आढळल्याने खळबळ

तिरुवनंतपुरम – संपूर्ण जग कोरोना महामारीशी झुंज देत असताना केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात ‘शिगेला’ या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. केरळमध्ये आतापर्यंत शिगेलाचे ८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ‘नागरिकांनी सावध राहावे आणि काळजी घ्यावी’, असे आवाहन आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी केले आहे. तसेच सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आरोग्य प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

वाचा :-देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,01,46,846 वर

मिळालेल्या माहितीनुसार, कोझिकोड जिल्ह्यात एका दीड वर्षीय मुलाला पोटदुखी आणि अतिसाराचा त्रास होऊ लागल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला शिगेला जीवाणूंचा संसर्ग झाल्याची माहिती काल डॉक्टरांनी दिली. शिगेला जीवाणूंमुळे शिगेलॉसिस हा आतड्यांचा आजार होऊ शकतो. अतिसार हे शिगेला संसर्गाचे प्रमुख लक्षण असून संक्रमित जेवण आणि पाण्यामुळे या जीवाणूचा संसर्ग होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

वाचा :-शेतकऱ्यांचे कृषी विधेयकाच्या विरोधात 30 व्या दिवशी सुद्धा आंदोलन सुरुच

दरम्यान, केरळमधील मुंडिक्कल्थजम, कोट्टापरंबू आणि वायनाडमध्ये शिगेलाचे रुग्ण आढळून आले आहेत. शिगेलामुळे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलाचा मृत्यूही झाला. कोझिकोडमध्ये १९ डिसेंबरला एक ११ वर्षीय मुलगा शिगेलाचा बळी ठरला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button