breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘शेरशाह अपवाद ठरला’; कमल हासन यांच्याकडून चित्रपटाच्या टीमचं कौतुक

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’  या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यातच आता आणखी एका मोठ्या कलाकाराच्या नावाचा समावेश झाला आहे. अभिनेते कमल हासन  यांनी ट्विट करत ‘शेरशाह’च्या संपूर्ण टीमची स्तुती केली आहे. दिग्दर्शक विष्णू वर्धन, मुख्य भूमिका साकारणारे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं. ‘विष्णू वर्धन यांच्यासारख्या प्रतिभावान दिग्दर्शकाला प्रमोट केल्याबद्दल धर्मा मूव्हीजचे आभार. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी तुमचेही अभिनंदन, उत्तम अभिनय’, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं.

‘लहानपणापासून एक चित्रपट चाहता आणि देशभक्त वडिलांचा मुलगा म्हणून काही चित्रपटांमध्ये भारतीय सैन्याचं केलेलं चित्रण पाहून मला राग यायचा. पण शेरशाह त्याला अपवाद ठरला. हा चित्रपट पाहून माझ्या सैनिकांसाठी अभिमानाने माझी छाती फुगते’, असं त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिलं.

कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर ‘शेरशाह’ हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटात विक्रम बत्रा यांची प्रेमकहाणीदेखील दाखवण्यात आली आहे. अभिनेता सिद्धार्थने विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली असून कियारा त्यांची गर्लफ्रेंड डिंपल छिमाच्या भूमिकेत आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १२ ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला असून देशभरातून त्याला दमदार प्रतिसाद मिळाला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button