breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

लहानपणीचा फोटो शेअर करत प्रीतम मुंडेंच्या पंकजा मुंडेंना अनोख्या शुभेच्छा..!

पुणे |

आज भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर त्यांचे चाहते, कार्यकर्त्यांकडून अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण सगळ्यात वेगळ्या आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत त्यांची लहान बहीण आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी. बरं, फक्त शुभेच्छाच नाही, तर त्यांनी त्यांच्या लहानपणीचा एक फोटोही शेअर केला आहे. प्रीतम मुंडे यांनी पंकजा यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. यात पंकजा आणि प्रीतम यांचा लहानपणीचा फोटो आणि त्यांचे आत्ताचे काही फोटो असं कोलाज आहे.

हा फोटो ट्विटरवर शेअर करत त्या म्हणतात, पाच वर्षांची असशील. तेव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही सांभाळत आहेस. जिच्या छायेत सुरक्षित वाटतं, त्या आभाळाएवढ्या मनाच्या आणि जमिनीशी घट्ट जोडलेल्या संस्काराच्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! पंकजा आणि प्रीतम यांच्या लहानपणीच्या फोटोमध्ये पंकजा या फोनवर बोलताना दिसत आहेत, तर प्रीतम या त्यांच्या शेजारी बसल्या आहेत. तर इतर दोन फोटोंमध्ये प्रीतम आणि पंकजा एकाच व्यासपीठावर बसलेल्या दिसत आहेत. त्या दोघींमध्ये संवाद चालला आहे असंही दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button