breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus:जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 89 लाखांवर

जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 89 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. मागील 54 तासात 5 हजारांहून अधिक मृत्यू कोरोनामुळं झाले आहेत. तर दोन लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.  वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 89 लाख 21 हजार 385 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 4 लाख 66 हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 47.43 लाख रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 62 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 8 देशांमध्येच आहेत.

वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौथ्या स्थानावर आला आहे. भारतात कोविडचे  4,11,727  रुग्ण आहेत. तर 13,277 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 170,269 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 228,181 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button