ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराष्ट्रिय

आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात.. घटस्थापना, शुभ योग, तिथी, संपूर्ण माहिती जाणून घ्या..!

पिंपरी: दुर्गा देवीला समर्पित नऊ दिवस चालणारा नवरात्रोत्सव रविवार १५ ऑक्टोबर म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. रविवारी घटस्थापना होणार आहे. हा उत्सव २३ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यंदा दुर्गा देवीचे वाहन हत्ती आहे. शास्त्रात असे मानले जाते की, नवरात्रीमध्ये जेव्हा देवी हत्तीवर स्वार होऊन येते, तेव्हा जास्त पाऊस होण्याची शक्यता असते. जाणून घ्या या उत्सवाची संपूर्ण माहिती..

नवरात्रीचा योग
ज्योतिषाच्या मते, या वर्षी शारदीय नवरात्र पूर्ण ९ दिवसांची असेल. ३० वर्षांनंतर एक दुर्मिळ योगायोग घडणार आहे. शारदीय नवरात्रीला बुधादित्य योग, शश राजयोग आणि भद्रा राजयोग तयार होत आहेत. यावर्षी शारदीय नवरात्र रविवार १५ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होत आहे. देवी भागवत पुराणात असे सांगितले आहे की, महालयाच्या दिवशी जेव्हा पूर्वज पृथ्वीवरून परततात तेव्हा देवी दुर्गा पृथ्वीवर येते.

देवीचे वाहन दर्शविते भविष्याचे संकेत
ज्या दिवशी नवरात्र सुरू होते. त्यानुसार प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वाहनांतून देवी येतात. देवीचे वेगवेगळ्या वाहनांतून येणे हे देखील भविष्याचे संकेत आहे जे येणारे वर्ष कसे असेल हे दर्शवते. दुर्गादेवीचे वाहन सिंह असले तरी नवरात्रीच्या सुरुवातीला देवीचे वाहन ऋतुमानानुसार बदलते. यंदा रविवारपासून नवरात्रीला सुरुवात होत असल्याने देवीचे वाहन हत्ती असणार आहे. देवीच्या या वाहनाचा संदेश हा देशाला येणाऱ्या काळात लाभू शकतो. लोकांना सुख-समृद्धी मिळेल.

हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व
ज्योतिषांनी सांगितले की, हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. रविवार १५ ऑक्टोबर २०२३ पासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी नवरात्री संपणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी विजयादशमी किंवा दसरा हा सण साजरा केला जाणार आहे. आश्विन महिन्याची प्रतिपदा तिथी १४ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ११.२४ पासून सुरू होईल. हे १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३२ पर्यंत चालेल. उदय तिथीनुसार १५ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे.

यंदा चांगला पाऊस होणार..
ज्योतिषांच्या मते, नवरात्रीच्या काळात देवीच्या स्वारीला विशेष महत्त्व असते. यंदा देवी हत्तीवर स्वार होऊन पृथ्वीवर येत आहे. हत्तीवरून मातेचे आगमन झाल्याने यंदा चांगला पाऊस होणार आहे. तसेच शेतीही चांगली होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. देशातील अन्नधान्याचा साठा वाढेल.

भाविकांवर विशेष आशीर्वादांचा वर्षाव
ज्योतिषींनी सांगितले की, धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये देवी हत्तीवर स्वार होऊन येतात तेव्हा ते खूप शुभ मानले जाते. देवी हत्तीवर स्वार होऊन आपल्यासोबत आनंद आणि समृद्धी घेऊन येते. देवीचे वाहन हत्ती हे ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक आहे. यातून देशात आर्थिक सुबत्ता येईल. तसेच ज्ञान वाढेल. हत्ती हे शुभाचे प्रतीक मानले जाते. अशा परिस्थितीत हे येणारे वर्ष खूप शुभ असेल. देवीची पूजा करणाऱ्या भाविकांवर विशेष आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे.

घटस्थापना तारीख: रविवार १५ ऑक्टोबर २०२३
घटस्थापना मुहूर्त: सकाळी ६.३० ते ८.४७
अभिजित मुहूर्त: सकाळी ११.४८ ते दुपारी १२.३६ पर्यंत

शारदीय नवरात्रीच्या तारखा
१५ ऑक्टोबर २०२३ – देवी शैलपुत्री (पहिला दिवस) प्रतिपदा तिथी
१६ ऑक्टोबर २०२३ – देवी ब्रह्मचारिणी (दुसरा दिवस) द्वितीया तिथी
१७ ऑक्टोबर २०२३ – देवी चंद्रघंटा (तिसरा दिवस) तृतीया तिथी
१८ ऑक्टोबर २०२३ – देवी कुष्मांडा (चतुर्थी दिवस) चतुर्थी तिथी
१९ ऑक्टोबर २०२३ – देवी स्कंदमाता (पाचवा दिवस) पंचमी तिथी
२० ऑक्टोबर २०२३ – देवी कात्यायनी (सहावा दिवस) षष्ठी तिथी
२१ ऑक्टोबर २०२३ – देवी कालरात्री (सातवा दिवस) सप्तमी तिथी
२२ ऑक्टोबर २०२३ – देवी महागौरी (आठवा दिवस) दुर्गा अष्टमी
२३ ऑक्टोबर २०२३ – महानवमी, (नववा दिवस) शारदीय नवरात्रीचा उपवास.
२४ ऑक्टोबर २०२३ – देवी दुर्गा मूर्तीचे विसर्जन, दशमी तिथी (दसरा)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button