Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सर्वसामान्यांना आणखी एक झटका; जेवणाच्या ताटातील चपाती महागली, गव्हासह पिठाच्या दरातही वाढ

नाशिकः अगोदरच महागाईच्या झळांनी हैराण झालेल्या नाशिककरांना आता दैनंदिन वापरातील वस्तूंच्या दरवाढीचा फटका बसत आहे. खाद्यतेल आणि भाजीपाल्यांच्या दरवाढीसह आता सर्वसामान्यांच्या जेवणातील चपातीही दरवाढीने करपली आहे.

गत दोन महिन्यांच्या तुलनेत गव्हासह तयार पीठाच्याही दरांत पाच किलोंमागे वीस रुपयांपर्यंतची दरवाढ झाल्याने अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. जगभरात गहू निर्यात करणारा युक्रेन पहिल्या क्रमांकाचा, तर रशिया तिसऱ्या क्रमांकावर असून, भारत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा देश आहे. गत काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे या दोन्ही देशांकडून जगभरात होणारी गव्हाची निर्यात बंद झाली आहे. त्यामुळे भारताकडून अधिक प्रमाणात गहू निर्यात केला जात असून, स्थानिक बाजारपेठेत गव्हाची आवक कमी झाली आहे. शहरात स्थानिक भागासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांतून गहू आयात केला जात असतो. परंतु, गतवर्षी अवकाळी पावसामुळे इतर पिकांसह गव्हाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अगोदरच बाजारपेठेत आवक कमी असताना इतर देशांतही निर्यात सुरू असल्याने दरांत क्विंटलमागे चारशे ते साडेचारशे रुपयांची वाढ झाली आहे. गव्हाच्या दरांत वाढ झाल्याने तयार पीठाचेही दर वाढले आहेत. गत वर्षी १५५ ते १६० रुपये पाच किलोंप्रमाणे मिळणारे तयार पीठ सद्यस्थितीत १७५ ते १८० रुपयांपर्यंत गेले आहे. पुढील वर्षाचे नवीन उत्पादन येईपर्यंत हे दर चढेच राहतील, अशी शक्यता व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.

तयार पीठाचे दर (रुपयांत)

वजन जुने दर नवे दर

१ किलो २० ते ३२ २८ ते ३५

५ किलो १५५ ते १६० १७५ ते १८०

१० किलो ३२० ते ३३० ३६० ते ३८०

गव्हाचे प्रतिक्विंटल दर (रुपयांत)

मिलबर- २६०० ते २८००

सेमी चंदेसी- ३००० ते ३४००

लोकवन- ३३०० ते ३५००

सिहोर- ४५०० ते ४८००

चंदेसी- ४८०० ते ५०००

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button