breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शरद पवारांची नेत्यांसोबत बैठक

मुंबई – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली असून मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आणि मंत्र्यांची बैठक बैलवली आहे. मुंबईतल्या व्हाय. बी. चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांची बैठक सुरु आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत तासभर चर्चा केल्यानंतर ते थेट व्हाय. बी. चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसाठी गेले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

सध्या कोठडीत असलेल्या वाझे यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून म्हणजेच एनआयएकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच विशेष शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी सोमवारी वाझेंच्या निलंबनाचे आदेश काढलेत. वाझे यांना शनिवारी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांना एनआयएकडून अटक करण्यात आलेली आहे. अटकेनंतर आता वाझेंना निलंबित करण्यात आलं आहे. सकाळपासून घडणाऱ्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीची बैठक पार पडत आहे. या बैठकीमध्ये सचिन वाझे प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button