breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘धार्मिक मुद्ध्यांना सत्ताधारी अधिक प्रोस्ताहन देत आहेत’; शरद पवार यांचा सरकारवर निशाणा

धार्मिक स्थळावर हल्ला करण्याची काय गरज

मुंबई : औरंगाबादमध्ये एका मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो घेऊन एक व्यक्ती नाचत असल्याचं समोर आलं. यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलच सुनावलं आहे.

शरद पवार म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्यये घटना घडली आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्येही काही झालं. कुणी तरी मोबाईलवर मेसेज पाठवला. चुकीचा असेल, नाही असे नाही. पण त्यासाठी लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरूप देणं योग्य नाही. सत्ताधारी वर्ग अशा गोष्टीला प्रोस्ताहित करतो. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. पण राज्यकर्त्येच रस्त्यावर उतरायला लागले, त्यांचे सहकारी उतरायला लागले तर दोन समाजात जातीय कटुता निर्माण होत आहे. ते योग्य नाही.

हेही वाचा – महापालिका सीसीटीव्ही निविदेतील ‘मॅफ’च्या मक्तेदारीला विरोध : आमदार अण्णा बनसोडे

मर्यादित भागात तणाव झाला असेल तर चांगली गोष्ट आहे. मी ते म्हणत नाही. पण हे घडत नाही. औरंगाबादेत औरंगाजेबाचा फोटो दाखवला. त्यासाठी पुण्यात दंगल करण्याचं काय कारण आहे? त्यासाठी पुण्यात आंदोलन करण्याचं कारण काय आहे? फोटो दाखवला त्यातून काय परिणाम होतो? कुणाला पडलंय त्याचं? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.

लव्ह जिहादसारख्या नाही त्या प्रश्नांना फाजील प्रश्नांना महत्व दिलं जातं आहे. कारण नसताना समाज-समाजात तेढ वाढवतो. या सगळ्या गोष्टींसंबंधी मीडियानेही फार प्रसिद्धी देऊ नये. केरळमध्ये चर्चेवर हल्ले झाले. ख्रिश्चन समुदाय हा शांत स्वभावाचा असतो. समजा एखाद्याची चूक झाली असेल, तर चर्चेसवर हल्ला करण्याचं कारण काय? या हल्ल्यांमागे विशिष्ट विचारधारा दिसून येते. ती विचारधारा देशहिताची नाही. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज यांना संरक्षण देण्याची गरज आहे. अदिवासी आणि दलित समाज या घटकांना जपणं हे देखील सरकारचं काम आहे, असंही शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button