breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

शरद पवार आमचे दैवत : …. अन्यथा सामूहिक राजीनामे देणार : अजित गव्हाणे

पिंपरी:  शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही आमची आजपर्यंतची राजकीय वाटचाल केली आहे. शरद पवार हे आमचे दैवत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही यापुढेही कार्यरत राहणार आहोत. त्यांनी राजीनामा मागे घ्यावी अशी आमची सर्वांची इच्छा असून त्यांनी राजीनामा मागे न घेतल्यास आम्हीही सामूहिक राजीनामा देऊ अशी जाहीर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि. २) निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावूक झाले. शरद पवार यांनी अचानक घेतलेला निर्णय हा कार्यकर्त्यांना मोठा धक्का देणारा ठरला आहे. त्याबाबत अजित गव्हाणे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे कीआमच्या राजकारणाची सुरुवातच शरद पवार यांच्याकडे पाहून झाली आहे. ते आमचे दैवत आणि राजकीय आदर्श आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय राजकीय क्षेत्रात काम करणे हे अशक्य आहे.

शहरातील सर्वच कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयामुळे भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष असायला हवेतअशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा मागे घ्यावाअशी आम्ही मागणी करत असल्याचेही गव्हाणे यांनी या पत्रात म्हटले आहे.

दरम्यानशरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा करताच त्याचे पडसाद पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीमध्येही उमटले. पक्षाच्या सर्वच माजी नगरसेवकांसहआजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात जमा झाले होते. त्यावेळी सर्वांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी केली. 

यावेळी बोलताना राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष म्हणाल्याराजकारणात तब्बल ६३ वर्ष काम करणारेराजकारण आणि समाजकारणाचे चालते फिरते विद्यापीठ म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. आमचे राजकीय क्षेत्रातील काम त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय होऊ शकत नाही. साहेबांनी त्यांचा निवृत्तीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा.

यावेळी पक्षाचे शहर कार्याध्यक्ष तथा माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे म्हणालेपक्षाध्यक्षपदी शरद पवार यांनीच यापुढेही कार्यरत रहावे. त्यामुळे आम्हाला उर्जा मिळत राहील. शरद पवार साहेब यांनी अध्यक्षपदी राहिले पाहिजेतअशी आमची सगळ्यांची इच्छा असल्याने त्यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा.

यावेळी ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडेवाहतूक सेल अध्यक्ष काशिनाथ जगतापसामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमलव्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्लाकामगार सेल अध्यक्ष किरण देशमुखअर्बन सेल अध्यक्ष दत्तात्रय जगतापअर्बन सेल महिला अध्यक्ष मनीषाताई गटकळउत्तर भारतीय सेल अध्यक्ष लाल मोहम्मद चौधरीउपाध्यक्ष शक्रुल्ला पठाणशाम जगतापतानाजी जवळकरमहिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविताताई खराडेकार्याध्यक्षा सविताताई धुमाळअर्बन सेल महिला निरीक्षक लताताई ओव्हाळमहिला सहकार्यध्यक्षा दिपालीताई देशमुखअर्बन सेल पिंपरी विधानसभा अध्यक्षा विजयाताई काटेसरचिटणीस राजेश हरगुडेभोसरी विधानसभा कार्याध्यक्षा ज्योतीताई गोफणेसंपर्कप्रमुख वाहतूक सेल राजू खंडागळेविद्यार्थी महासंघटक राहुल आहेरयुवक मुख्य संघटक शदाब खानयुवक सचिव पियुश अंकुशचिंचवड विधानसभा अर्बन सेल महिला अध्यक्ष प्रियाताई देशमुखमहिला उपाध्यक्ष आशाताई मराठेयुवक सचिव मेघराज लोखंडेधनाजी तांबेसुनील आडागळेगणेश हरजुळेइत्यादी पदाधिकाऱ्यांसह पक्षाचे माजी नगरसेवक व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याशिवाय राजकारण आणि राजकारणाशिवाय पवार साहेब याची कल्पना होवू शकत नाही. आदरणीय पवार साहेबांच्या शिव फुले शाहू आंबेडकर या विचारधारेमुळे आम्ही राजकारणात आलो. आता देवच नसेल देव्हाऱ्यात नसेल तर त्याची पूजा करून काय फायदा तर त्याची पूजा करून काय फायदा ? सध्या देशातील एकूणच परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील तसेच देशातील अल्पसंख्याक समाज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कडे मोठ्या आशेने पाहत आहे आदरणीय पवार साहेब ही अल्पसंख्याक समाजाची शेवटची आशा आहे. जर आदरणीय शरद पवार साहेबांनी राजीनामा परत घेतला नाही तर शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या समवेत आम्ही पिंपरी चिंचवड शहरातील युवक पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार आहोत.
– इम्रान शेख, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button