breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘कार्तिकी एकादशी’ची संभाव्य गर्दी रोखण्यासाठी देहूतील मंदिरे राहणार बंद

देहूगाव |महाईन्यूज|

तीर्थक्षेत्र देहू येथील मुख्य मंदिरात गुरुवारी (दि. 26) पंढरपूर कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांची संभाव्य गर्दी होण्याची शक्‍यता असल्याने येत्या बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे सलग तीन दिवस (25 ते 27 नोव्हेंबर) मुख्य मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

कोविड संसर्गामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे पाडव्याच्या मुहुर्तावर सुरू झाली असली तरी कार्तिकी यात्रेवर पुन्हा निर्बंध येण्याचे सावट आहे. देशभरात कोविड संसर्ग अजूनही आटोक्‍यात आला नाही, अशातच दुसरी लाट येण्याची भीती आरोग्य यंत्रणेने व्यक्‍त केली आहे.

गुरुवारी (दि. 26) पंढरपूर कार्तिकी एकादशी असून, त्यानंतर 11 डिसेंबरला कार्तिकी एकादशी म्हणजे तीर्थक्षेत्र आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन सोहळा आहे. आळंदी येथील ही यात्रा मोठ्या स्वरूपात होत असते.

गुरुवारी होणाऱ्या कार्तिकी एकादशीनिमित्त कोकण, कर्नाटक भागातून भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरात येत असतात. यामुळेच सोलापूर जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी यात्रा सुद्धा प्रतिकात्मक रूपात साजरी करावी. तसेच आषाढी यात्रा पद्धतीने नियम असावेत, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला दिला आहे. त्यामुळे आता आषाढी वारी पद्धतीने कार्तिकी यात्रा रद्द करण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button