Uncategorized

शरद पवारांची काल राजनाथ सिंह यांच्याशीही तर आज मोदींशी भेट

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांची दिल्लीत आज महत्वाची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. पवार आणि मोदी यांची मोदी यांच्या निवसस्थानी ही भेट झाली. दरम्यान, काल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशीही पवार यांची चर्चा झाली होती. राजनाथ यांनी पवार यांना खास दिल्लीत बोलावले होते. शिवाय नवं सहकार खातं अमित शाहांकडे आहे. त्यामुळे सहकारसमोरील आव्हानं काय, साखर कारखाने, दूध संस्था यांच्यासमोरील प्रश्नांबाबत चर्चा असू शकते. याशिवाय सध्या शेतकरी आंदोलन 8 महिने सुरु आहे. आजच्या बैठकीत यावरही चर्चा झालेली असू शकते. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येतील असं पवारांनी कधीही संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे सध्या तशी शक्यता नाही”

 

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाली. या भेटीचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. मात्र, नव्याने निर्माण करण्यात आलेलं सहकार खातं, महाराष्ट्रातील आणि देशातील सहकाराचे प्रश्न, सहकार खात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि बँकिंग संदर्भातील विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button