पिंपरी / चिंचवड

चाकण येेथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी l प्रतिनिधी

मैत्रिणीच्या घरी बोलावून एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार डिसेंबर 2021 मध्ये खराबवाडी येथे घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मुकुंदसिंग कप्पूसिंग लोधी (वय 20, रा. महाळुंगे, ता. खेड. मूळ रा. मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने 29 मे 2022 रोजी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत मैत्रिणीच्या घरी गेली होती. तिथे आरोपी हजर होता. त्याने फिर्यादीसोबत मैत्री करण्याच्या बहाण्याने जवळीक साधून फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला. यावेळी फिर्यादी मुलीची मैत्रीण घराबाहेर गेली होती. तिने तिच्या घराचा दरवाजा बाहेरून ओढून घेतला होता.

‘कुणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या घरच्यांना सोडणार नाही’ अशी आरोपीने धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला मैत्रिणीसोबत बोलावून घेत आणखी तीन ते चार वेळा लैंगिक अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button