breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

भारतीय उद्योगपतीकडून मॅच फिक्सींगसाठी दबाव, झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा धक्कादायक खुलासा

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज ब्रेंडन टेलरने धक्कादायक खुलासा केला आहे. स्पॉट फिक्सींगमध्ये सहभागी होण्यासाठी भारतामधील काही सट्टेबाजांनी आपल्याशी संपर्क केल्याचं टेलरने मान्य केलं आहे. टेलरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली आहे.

ऑक्टोबर २०१९ च्या अखेरीस आपल्याला भारतातील एका उद्योगपतीने संपर्क साधून झिम्बाब्वेत एका टी-२० स्पर्धेच्या आयोजनाबद्दल चर्चा करण्यासाठी भारतात बोलावलं होतं. या प्रवासासाठी मला १५ हजार डॉलर्स देण्यात येणार होते. त्यावेळी परिस्थिती इतकी खराब होती की झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाकडून आम्हाला ६ महिन्यांचं मानधन मिळालं नव्हतं. तसेच आगामी काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे सहभागी होईल की नाही इथपासून शंका होती.

यानंतर आपल्या स्पष्टीकरणात टेलर म्हणतो, मी यानंतर भारतात गेलो. हॉटेलमध्ये अखेरच्या रात्री भारतीय उद्योगपती आणि त्याच्या साथीदाराने पार्टीसाठी मला एका ठिकाणी नेलं. त्या पार्टीत दारु प्यायल्यानंतर कोकेन देण्यात आलं आणि मी वेडेपणा करुन ते कोकेन घेतलं. यानंतर दुसऱ्या दिवशी काही लोकं माझ्या हॉटेल रुममध्ये शिरली आणि त्यांनी मला मी कोकेन घेत असतानाचा व्हिडीओ दाखवला. जर मी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मॅचफिक्सींग केली नाही तर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

मी त्यावेळी प्रचंड घाबरलो होतो, मला माझ्या जिवाची भीती वाटत होती. मी स्वतःहून या परिस्थितीत अडकलो होतो असं टेलरने म्हटलं आहे.

गेल्या दोन वर्षांपासून मी या ओझ्याखाली वावरतो आहे. याचा माझ्या मानसिकतेवर परिणाम व्हायला लागला आहे. मी काही दिवसांपूर्वीच माझे जवळचे मित्र आणि परिवाराला याबद्दल सांगितलंआपल्यावर स्पॉटफिक्सींगसाठी दबाव टाकण्यात आला असला तरीही माझी मानसिकता बिघडल्यामुळे मी ते काम करुच शकलो नाही. ज्यानंतर त्या उद्योगपतीने आपले पैसे परत मागायला सुरुवात केल्याचंही टेलर म्हणाला. यानंतर मी हा प्रकार आयसीसीच्या लक्षात आणून दिल्याचं टेलरने सांगितलं. परंतू या घटनेनंतर क्रिकेटवर असलेल्या स्पॉट फिक्सींगच्या सावटाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button