TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

खासगी रुग्णालयातील ‘आयसीयू’तील गंभीर रुग्णाला महापालिकेच्या ‘आयसीयूत’ दाखल करुन घेणार नाही

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यापार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. शहरातील खासगी रुग्णालयातील आयुसीयू मधील गंभीर रुग्णाला थेट महापालिकेच्या आयसीयूमध्ये दाखल करुन घेतला जाणार नसल्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.जगभरात कोरोना विषाणूचा नवा प्रकार ‘ओमायक्रॉन (Omicron)’ आढळून आला आहे. या विषाणूचा प्रभाव पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये दिसून येत आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने प्रतीबंधात्मक उपाययोजना व आवश्यक ती खबरदारी घेत आहे. ‘ओमायक्रॉन (Omicron)’ या विषाणूमुळे येऊ घातलेली तिसरी लाट थोपविण्यासाठी महापालिकेमार्फत 7 रुग्णालये सज्ज आहेत.

महापालिकेने गरजेनुसार कोविड केअर सेंटर (CCC) सुरु करण्याबाबत कार्यवाही सुरु केलेली आहे. त्यानुसार घरकुल, चिखली येथील B10 बिल्डींगध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आलेले आहेत. टप्प्याटप्प्याने इतर कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येतील. कोविडची लक्षणे आढळल्यास त्वरीत टेस्टिंग करुन घ्यावे. महानगरपालिकेच्या 8 झोनल रुग्णालयामध्ये ( भोसरी रुग्णालय, सांगवी रुग्णालय, वायसीएम रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, थेरगाव रुग्णालय, आकुर्डी रुग्णालय, तालेरा रुग्णालय व यमुनानगर रुग्णालय) येथे टेस्टिंगची सोय मोफत करण्यात आलेली आहे.

जम्बो कोविड सेंटर व ऑटोक्लस्टर सेंटरमध्ये रुग्णांची थेट भरती करण्यात येणार नाही. त्यासाठी महापालिकेच्या वरील सर्व रुग्णालयामधून संदर्भित केलेली चिठ्ठी (Refer Chit) घेणे आवश्यक आहे. खासगी रुग्णालयातील आयुसीयू मधील गंभीर रुग्ण थेट महापालिकेच्या आयसीयूमध्ये दाखल करुन घेतला जाणार नाहीत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमधील रुग्णांना महापालिका रुग्णालयामध्ये प्राधान्याने भरती केले जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button