breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

ताजमहालमध्ये बॉम्बच्या अफवेने खळबळ; एकाला अटक, शोधमोहिम सुरु

देशाची शान असलेल्या ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र ही अफवा असल्याचं आग्र्याच्या पोलीस महानिरीक्षकांनी स्पष्ट केलं. बॉम्ब असल्याची माहिती मिळताच पर्यटकांना बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर ताजमहाल परिसरात जाण्याचे मार्ग बंद करण्यात आले होते. अज्ञात व्यक्तीने फोन करुन ताजमहालमध्ये स्फोटकं ठेवल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र ही निव्वळ अफवा असल्याचं समोर आलं आहे.

वाचा :-इन्कम टॅक्स विभागाकडून आज सलग दुसर्‍या दिवशी commerce centre of a talent management company वर धाड

मात्र ताजमहालमध्ये स्फोटकं ठेवल्याची माहिती खोटी असल्याची माहिती आग्र्याचे पोलीस महानिरीक्षक ए सतीश गणेश यांनी दिली. फिरोजाबाद येथील एका व्यक्तीने फोन करुन ही खोटी माहिती दिली होती. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. बॉम्बची माहिती मिळताच ताजमहाल परिसरात मोठ्या प्रमाणात सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिस तैनात करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, आता संपूर्ण ताजमहालमध्ये शोध मोहीम राबवली जात आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button