breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील २० उमेदवार घोषित

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

नंदुरबारमधून हिना गावित यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. हिना गावित या सध्या तिथल्या खासदार आहेत. त्या गेल्या १०.वर्षांपासून नंदुरबारच्या खासदार आहेत. त्यामुळे त्यांना यावेळी विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी पक्षाने दिली आहे.

धुळे मतगारसंघातून सुभाष भामेर यांमा उमेदवारी जाहीर झाली आहे. सुभाष भामरे यांच्या उमेदवारीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरु होती. त्यांचं तिकीट कापलं जाईल, अशी चर्चा सुरु होती. पण पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा संधी दिली आहे.

जळगाव मतदारसंघात भाजपने धक्कातंत्रचा अवलंब केला आहे. जळगावात भाजपने विद्यामान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं आहे. या ऐवजी माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्मिता वाघ भाजपच्या विधान परिषदेच्यादेखील आमदार होत्या. तसेच ते भाजपचे दिवंगत नेते उदय वाघ यांच्या पत्नी आहेत. स्मिता वाघ यांच्याकडे जळगावात आदराने पाहिलं जातं. त्यांचा समर्थक वर्ग मोठा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्लाच मानला जातो. असं असलं तरी आगामी काळात काय निकाल येतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा – महिलांना दर वर्षी १ लाख रुपयांची आर्थिक मदत, काँग्रेसच्या महिलांसाठी ५ मोठ्या घोषणा

रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांना संधी देण्यात आली आहे. रक्षा खडसे यांच्या उमदेवारीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. रक्षा खडसे या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल, अशी चर्चा होती. पण त्यांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे.

अकोला मतदारसंघातून अनूप धोत्रे यांना संधी देण्यात आली आहे. अनूप धोत्रे हे अकोल्याचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे चिरंजीव आहेत. संजय धोत्रे हे चारवेळा खासदार म्हणून अकोल्यातून निवडून आले आहेत.

वर्धा मतदारसंघातून रामदास तडस यांना संधी देण्यात आली आहे. रामदास तडस हे २०१४ च्या निवडणुकीत निवडून आले होते. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते निवडून आले होते.

महाराष्ट्र भाजपा उमेदवारांची यादी

हिना गावित – नंदुरबार

सुभाष भामरे – धुळे

स्मिता वाघ – जळगाव

रक्षा खडसे – रावेर

अनुप धोत्रे – अकोला

रामदास तडस – वर्धा

नितीन गडकरी – नागपूर

सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर

प्रतापराव चिखलीकर – नांदेड

रावसाहेब दानवे – जालना

भारती पवाण – दिंडोरी

कपिल पाटील – भिवंडी

पियूष गोयल – उत्तर मुंबई

मिहिर कोटेचा – मुंबई उत्तर पूर्व

मुरलीधर मोहोळ – पुणे

सुजय विखे पाटील – अहमदनगर

पंकजा मुंडे – बीड

सुधाकर श्रृंगारे – लातूर

रणजीत सिंह नाईक निंबाळकर – माढा

संजयकाका पाटील – सांगली

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button