ताज्या घडामोडीमुंबई

आणखी तीन कासवांचे उपग्रहीय टॅगिंग

मुंबई | कासवांच्या समुद्रातील भ्रमणमार्गाचा अभ्यास करण्याच्यादृष्टीने आणखी तीन कासवांचे उपग्रहीय निरीक्षण केले जाणार आहे. मंगळवारी आणि बुधवारी गुहागर येथील मादी कासवांचे उपग्रहीय टॅगिंग वन विभागातर्फे करण्यात आले. वनश्री, लक्ष्मी आणि रेवा अशी या कासवांची नावे आहेत.दरवर्षी ऑलिव्ह रिडले कासवे समुद्र किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात; मात्र दरवर्षी कासवे एकाच ठिकाणी अंडी घालतात का, त्यांचा भ्रमणमार्ग कसा असतो, इत्यादी गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे उपग्रहीय टॅगिंग करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी वेळास आणि आंजर्ले येथील प्रथमा आणि सावनी या कासवांचे उपग्रहीय टॅगिंग करण्यात आले आहे. मंगळवारी आणि बुधवारी गुहागर येथील वनश्री, लक्ष्मी आणि रेवा या कासवांचे उपग्रहीय टॅगिंग करण्यात आले.

मोठी बातमी! अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; कारसहीत बंगल्यात शिरताना पकडल्यावर म्हटला, “माझ्या शरीरात चीप…” आतापर्यंत प्रथमा या कासवाने वेळास- दिवेआगार- जयगड- गुहागर- दाभोळ असा ७५ किमीचा प्रवास केला आहे. सावनी मात्र आंजर्ले किनारा आणि जवळपासच्या परिसरातच फिरत आहे. उपग्रहीय टॅगिंगमुळे कासवांची संख्या, त्यांचा भ्रमणमार्ग, खाण्याचे ठिकाण आणि त्यांचे वर्तन या गोष्टींचा अभ्यास करता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button