ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

संजय राऊतांचे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर ः ‘भाजपाच्या काही लोकांचे मेंदू किड्या-मुंग्यांसारखे…

मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? यासंदर्भात संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी खोचक टीका केली होती. त्यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? यासंदर्भात संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी खोचक टीका केली होती. त्यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. “भाजपाच्या काही लोकांचे मेंदू किड्या-मुंग्यांचे मेंदू आहेत असं मला दुर्दैवाने म्हणावं लागतंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत का? त्या नात्याने आम्ही म्हटलं की ते आमचे आहेत. त्यांचा जन्म भारतातच झालाय”, अशा शब्दांत संजय राऊतांनी चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चित्रा वाघ यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी ते म्हणाले की, “भाजपाच्या काही लोकांचे मेंदू किड्या-मुंग्यांचे मेंदू आहेत असे मला दुर्दैवाने म्हणावे लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत का? त्या नात्याने आम्ही म्हटले की ते आमचे आहेत. त्यांचा जन्म भारतातच झाला आहे. आंबेडकरांचा जन्म १८९१ साली आत्ताच्या मध्य प्रदेशात झाला. तेव्हा मध्य प्रदेश नव्हते. फक्त एकच मुंबई प्रांत होता. भाषिक राज्य कधी निर्माण झाली, याचा अभ्यास करावा. त्यांना कळते का? अभ्यास त्यांनी करायचाय”

“बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, तेव्हा देशात कोणतेही राज्य नव्हते. आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत हे जर त्यांना माहीत नसेल, कळत नसेल तर अजूनही त्यांच्या आंबेडकरांविषयी काय भावना आहेत, हे स्पष्ट होते आहे. भाजपामध्ये काय लायकीचे आणि बुद्धीचे लोक बाहेरून घेतलेत ते कळते. त्यांच्या जिभेवर काय, डोक्यात काय, पोटात काय? वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, आंबेडकर, फुलेंचा अपमान करतायत आणि आम्हाला शिकवतायत”, अशा शब्दांत संजय राऊतांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली.

काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?
“रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील, याचं दर्शन आज महाराष्ट्राला झालं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही, मध्य प्रदेशमधील महू येथे झाला आहे. इतकं सामान्य ज्ञान असू नये? आमचे आदर्श असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवता आहात? अशा पद्धतीने राष्ट्रपुरुषांचा अपमान तुम्ही करायचा आणि मोर्चेपण तुम्ही स्वत:च काढायचे, मूर्ख समजू नका महाराष्ट्र तुम्हाला पुरता ओळखून आहे, तुमचा जाहीर निषेध” असे चित्रा वाघ यांनी ट्वीट करत म्हटले होते.

दरम्यान, सत्ताधारी पक्षातील लोकांकडून महापुरुषांविषयी केली जाणारी विधाने, कर्नाटककडून सीमाभागात केली जाणारी आगळीक अशा अनेक मुद्द्यांचा निषेध करण्यासाठी शनिवारी १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, मविआच्या या मोर्चाला अद्याप पोलीस आणि सरकारची परवानगी मिळालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर आज संजय राऊतांवी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवरही निशाणा साधला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button