breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘काही दिवसांनी हे काळ्या टोप्या घालून फिरतील’; संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका

मुंबई : काल दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटाचे स्वतंत्र मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यांमध्ये एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपाला मजबूत करा म्हणत होते. यांनी भाजपाच्या समोर एवढे गुडघे टेकत आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच देशाचं, जनतेचं, महाराष्ट्राचं म्हणणं मांडलं. पण हे मेळाव्यात म्हणतात भाजपाला मजबूत करा, मोदींना मजबूत करा, नड्डांना मजबूत करा, फडणवीसांना मजबूत करा. शिवसेनेची सभा होती ना तुमची? भाजपाने पाठवलेल्या भाड्याच्या लोकांसमोर तर त्यांना मोदींचा विजय असो, अमित शाहांचा विजय असो हेच म्हणावं लागेल.

हेही वाचा – सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला, मनोज जरांगे पाटील यांचं पुढचं पाऊल काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा आरक्षण देणार असल्याचं ठामपणे आश्वासन मेळाव्यात दिलं. यावरून संजय राऊत म्हणाले, मराठा आरक्षण द्यावंच लागेल. उपकार करताय का? नाहीतर महाराष्ट्रात आग लागेल. तुम्हाला कुणीही विचारणार नाही. तुम्ही कुणाच्या मेहेरबानीनं मुख्यमंत्री झालात, का झालात हे सगळ्यांना माहिती आहे. जोपर्यंत तुम्हाला तिथे बसवलंय, तोपर्यंत तुम्हाला हे काम करावंच लागेल.

भाजपाच्या सहवासात आल्यापासून खोट्या शपथा घेण्याचं प्रमाण वाढलंय. २०१४ साली म्हणत होते शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मोदींबरोबर आहे. तेव्हापासून शिवरायांचं नाव राजकारणात वापरण्याची प्रथा सुरू झाली आहे. शपथा कसल्या घेताय तुम्ही? बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी करायची, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसायचा, मराठी माणसाच्या एकजुटीला तडा द्यायचा आणि वर छत्रपतींची शपथ घ्यायची? हे सगळं भाजपाच्या इशाऱ्यावर चाललंय. यांना स्वत:चा आचार-विचार नाहीये. जे भाजपा सांगेल तेच. काही दिवसांनी हे डोक्यावर काळ्या टोप्या घालून फिरतील. शिंदे गटाला भाजपामध्ये जावं लागेल. म्हणे रक्ताला शेवटचा थेंब असेपर्यंत वगैरे. शेवटचा थेंब असेपर्यंत हे शिवसेनेत राहणार होते. राहिले का? भाजपा आमचा छळ करतंय सांगत जाहीर सभेत राजीनामा देणारे हे. आता भाजपानं त्यांना मांडीवर घेतलंय, असंही संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button