breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘पंतप्रधान मोदी मगरीचे अश्रू ढाळणारे, नौटंकी’; ठाकरे गटाची खोचक टीका

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिक, पिंपळगाव, कल्याण येथे त्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. मुंबईत त्यांचा रोड शोही होणार आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी मगरीचे अश्रू ढाळणारे, नौटंकी करणारे गृहस्थ आहेत, असं ते म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, शिवसेना महाविकास आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रस्त्यावर आणलय. पराभवाच्या भीतीने भाजपा प्रत्येक गल्लीबोळात पंतप्रधान मोदींना फिरवत आहे. महाविकास आघाडी मुंबईत 6 जागा लढवत आहे, सर्व 6 जागा जिंकू’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींना मुंबईत ठाण मांडून बसाव लागतय. तुमच्यावर दररोज भटकण्याची ही वेळ का आली? हे लोकांना कळू द्या, असं ते म्हणाले.

हेही वाचा    –    इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, एका व्यवसायिकावर गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात रोड शो करतात. दुसरं काम नाही का?. मणिपूरला गेले नाहीत. जम्मूमध्ये काश्मिरी पंडितांचे अश्रू पुसायला गेले नाहीत. घाटकोपरला १८ लोकांचे मृतदेह सापडलेत, त्यांच्याविषयी संवेदना नाही. आज कदाचित तिथे जाऊन नाटक करतील. मोदी मुंबईत, महाराष्ट्रात जिथे जातील, तिथे पराभव निश्चित आहे. महाराष्ट्रातील जनतेने निर्णय घेतलाय. उमेदवार कोणी असो, मोदी नको. मोदी गो बॅक ही गावागावातील घोषणा आहे. आतापर्यंत जिथे निवडणुका झाल्यात तिथे ९० टक्के जागा मविआ जिंकणार, असंही संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button