ताज्या घडामोडीमुंबई

संजय राऊत मर्द शिवसैनिक आहे, घाबरण्याचा प्रश्नच नाही; फडणवीसांवर निशाणा

मुंबई |  मुंबई पोलिसांनी चौकशी केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ऐकण्यात व पहाण्यात काही तरी दोष निर्माण झालाय. संजय राऊत मर्द शिवसैनिक आहे. घाबरण्याचा प्रश्नच नाही,असं म्हणत राऊतांनी फडणवीसांना सुनावलं आहे.

ट्विटमध्ये संजय राऊत म्हणाले की, ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ऐकण्यात व पहाण्यात काही तरी दोष निर्माण झालाय. संजय राऊत मर्द शिवसैनिक आहे. घाबरण्याचा प्रश्नच नाही. केंद्रीय तपास यंत्रणा किती खोटे पणाने कारवाया करतात याचा पोलखोल करण्यासाठी मी दोन पत्रकार परिषद घेतल्या.पुराव्यासह. इतकेही खोटे बोलू नका.’ असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button