breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नाशिकच्या काळा राम मंदिरातील स्वच्छता मोहिमेवरून संजय राऊतांची मोदींवर टीका; म्हणाले..

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल नाशिक दौऱ्यावर होते. गोदावरी नदीच्या तीरावर जलपूजन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. पंतप्रधान मोदींनी काळा राम मंदिरात पूजा, आरती करण्याआधी त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. हातात झाडू घेऊन त्यांनी स्वतः स्वच्छता केली. स्वच्छता करतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले, आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, काळाराम मंदिरात येऊन त्यांनी साफ सफाई केली. याची खरंच गरज होती का? पंतप्रधान मंदिरात येणार म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने मंदिरातील साफसफाईवर किमान सात ते आठ लाख रुपये खर्च केले. मंदिर अगदी चकाचक केले होते. मंदिर ट्रस्टने देखील सफाईसाठी २ लाख रुपये खर्च केले असे समजते. बऱ्याच ठिकाणी लादीवर रेड कार्पेट टाकले होते. तरीही देशाच्या पंतप्रधानांना हाती मॉप घेऊन पुन्हा साफसफाई करावी लागली. याचा अर्थ काय? सरकारने साफसफाईच्या नावाखाली फक्त लाखो रुपये उधळले की काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा   –    अटल सेतूचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; हायटेक ORT टोलद्वारे होणार कलेक्शन? 

दरम्यान, अयोध्येत २२ जानेवारीच्या दिवशी राम मंदिराचं उद्घाटन केलं जातं आहे. तसंच रामच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याच्या आधी देशातल्या सगळ्या मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. तसंच काल काळा राम मंदिरात त्यांनी जी स्वच्छता मोहीम राबवली त्याचीही चर्चा सोशल मीडियावर होते आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button