breaking-newsमहाराष्ट्र

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. असं असतानाही महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरूद्ध शासकीय आदेश न पाळल्यामुळे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फक्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र तुकाराम मुंढे २०० लोकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. याबाबत मनीष मेश्राम यांनी तक्रार केली आहे. 

हॉटेल रजवाडा पॅलेसमधील सभागृहात ३१ मे २०२० रोजी २०० लोकांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी २०० लोकांच्या उपस्थितांना मंचावरून संबोधित केलं आहे. या कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्र शासनाचे दिलेले नियम पाळले नाहीत. यामुळे मेश्राम यांनी तक्रार केली आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात वाढत आहे. अशा वेळी मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्र येणं टाळलं पाहिजे. अशावेळी मुंढे यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून नियम मोडले असल्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button