breaking-newsTOP Newsपुणेमहाराष्ट्र

पुणे विद्यापीठात कोरोनाचा शिरकाव, तिघांना विषाणुचा संसर्ग

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना विषाणुचा शिरकाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झाला आहे. विद्यापीठातील सेवक चाळीतील दोघांना, तर एका अधिकाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे विद्यापीठातील 4 इमारती 7 दिवसांसाठी सील केल्या आहेत. विद्यापीठात अत्यावश्यक कामांशिवाय कुणीही येऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. याशिवाय कर्मचारी, प्राध्यापक आणि अधिकाऱ्यांना ऑनलाईन कामांवर भर देण्यास सांगण्यात आलं आहे.

पुणे विद्यापीठाने विद्यापीठ परिसरातील कर्मचाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच विद्यापीठाबाहेरील व्यक्तींना अत्यावश्यक कामाशिवाय परिसरात येऊ नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. दरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्यात शनिवारी ( दि. 18) दिवसभरात 2081 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली.

यासह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 48 हजार 953 वर पोहचली आहे. काल दिवसभरात 39 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1282 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. दुसरीकडे उपचारानंतर बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांचं प्रमाणही मोठं आहे. काल दिवसभरात 774 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button