breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एस. एन.बी.पी. विधी महाविद्यालयात वाचन प्रेरणादिनाचे आयोजन

पिंपरी :प्रतिनिधी
भारतरत्न पुरस्काराने सन्मानित, भारताचे माजी राष्ट्रपती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्षेपणास्त्र निर्माते,ध्येयवेडे संशोधक डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर हा “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो. एस. एन.बी.पी. शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.डी. के. भोसले डॉ. वृषाली भोसले यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रोहिणी जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार मोरवाडी,पिंपरी येथील एस. एन.बी.पी. विधी महाविद्यालयात ” वाचन प्रेरणा दिनाचे ” आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्या डॉ. रोहीणी जगताप यांनी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम व भारताच्या ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ग्रंथपाल सुभाष राशिवडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी वाचकामध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून वाचन प्रेरणा दिन आयोजित केला असल्याचे सांगितले . तसेच डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम व डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.

सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्या डॉ. रोहीणी जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पुढील कालावधीत वाचकाभिमुख ग्रंथालयीन सेवांचे प्रारंभ करण्याचे त्यांनी सुतोवाच केले. ग्रंथ हेच गुरु आहेत, मराठी साहित्य व साहित्यिक यांचे मराठी भाषेतील योगदानाचा त्यांनी आढावा घेतला व जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही , वाचाल तर वाचाल , ग्रंथ हाच खरा मित्र , मार्गदर्शक असल्याचे मत डॉ. जगताप यांनी व्यक्त केले.
या कार्याक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एस. एन.बी.पी. इंटरनेशनल स्कूल च्या उपप्राचार्या स्मिता शाजापूरकर उपस्थित होत्या. सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन करणे गरजेचे आहे. इंटरनेट, फेसबुक, व्हाटसअप्च्या जमान्यात कथा, कादंबऱ्या,चरित्रे , आत्म- चरित्रे, कविता , प्रवास वर्णने, अनुवादित साहित्य , ललीत वाचन केले पाहिजे व त्यासाठी ग्रंथालये सज्ज असली पाहिजेत असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

तसेच ग्रंथालय विभागामार्फत ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले होते. वाचन प्रेरणा दिनानिमित्त आज ग्रंथालयातील काही जुन्या पुस्तकांची शिस्तबद्ध मांडणी करून ती सर्वांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली, आज या निमित्ताने सर्वांनी हे ग्रंथ पाहून त्याची माहिती करून घ्यावी हा यामागील उद्देश होता . प्रमुख पाहुण्याच्या हस्ते “ग्रंथालय शास्त्राच्या नियमाचे वीणेल फॉमचे” उद्घाटन झाले. या कार्यक्रमात तृतीय वर्षाच्या माजी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयास पुस्तके भेट दिली . त्यांचा ग्रंथालय विभागामार्फत सत्कार केला.
प्रा.कैलाश पौळ यांनी ग्रंथ वाचन करत करताना वाचकांनी अनुभूती कडून अनुभवाकडे जाण्याचे आवाहन केले. संत वचनाचा व वाचन संस्कृतीचा संबध सामाजिक व सास्कृतीक विकासाशी असलेचे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले.

या नंतर सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी एक तास ग्रंथालयात बसून वाचन केले व नंतर वाचलेल्या आशयावर चर्चा केली.मोबाईलच्या युगात सर्वांनी वाचन संस्कृती जपावी हा संदेश देत या कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रा. स्वप्निल जाधव यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे समन्वयक ग्रंथपाल प्रा.सुभाष राशिवडेकर , व कैलाश पौळ समन्वयक, अंतर्गत गुणव-ता हमी कमिटी व एस. एन.बी.पी. विधी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयातील आजी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button