ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

मोशी अग्निशामक केंद्र चालू करा; रुपाली आल्हाट यांचा आंदोलनाचा इशारा

मोशी अग्निशामक केंद्र सात महिन्यापासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी येथे अग्निशामक केंद्र उभारण्यात आले. पण, उद्घाटनाअभावी हे अग्निशामक केंद्र चालू होऊ शकले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. सदर केंद्र तात्काळ सुरू करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या रुपाली आल्हाट यांनी दिला आहे.

गेले सहा ते सात महिन्यापूर्वी श्री नागेश्वर महाराज अग्निशामक केंद्र मोशी या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. पण, उद्घाटन रखडले आहे. मोशी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या रूपाली परशुराम आल्हाट यांनी म्हटले आहे की, मोशीकरांना अग्निशामक केंद्र लाभले पण याचे उद्घाटन न झाल्याने ही इमारत पूर्ण होऊन पण मोशीकरांच्या कुठल्याही फायद्याचे नाही. या इमारतीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे हे कळत नाही? मात्र, अशा परिस्थितीमध्ये मोशीमध्ये आगीचे प्रकार घडल्यास कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मोशी येथील कचरा डेपोत आगीच्या दुर्घटना घडतात. त्यावेळी कचऱ्याने पेट घेतल्यानंतर ही आग विझवण्याकरिता अग्निशामक दलाच्या गाड्या वायसीएम किंवा कुदळवाडी या केंद्रातून मागवाव्या लागतात. या गाड्या येण्यासाठी 30 ते 40 मिनिटे लागतात तोपर्यंत आगीने रुद्र रूप धारण केलेले असते. आग आटोक्यात येण्याच्या पलीकडे गेली जाते. पण, हेच मोशी येथील अग्निशामक केंद्र चालू झाल्यानंतर गाडी पाच मिनिटाच्या आत त्या ठिकाणी पोहोचेल आणि आगीवरती नियंत्रण मिळू शकते. तसेच, मोशी येथील आजूबाजूच्या परिसरात कुठलाही प्रकार घडल्यानंतर आगे वरती नियंत्रण मिळवण्यासाठी मोशी अग्निशामक केंद्राचा चांगला उपयोग होणार आहे. पण, हे केंद्र मोशीकरांच्या सेवेत सुरू करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही रुपाली आल्हाट यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button