पुणे

माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या अंगावर धावून जात शिक्षकांना दमदाटी : पालकावर गुन्हा दाखल

दौंड तालुक्यातील घटना

पुणे l प्रतिनिधी

‘माझ्या मुलाचा निकाल कधी देणार’ असे म्हणत एका विद्यार्थ्यांच्या पालकाने शाळेत येऊन दोन शिक्षकांना दमदाटी केली. हा प्रकार दौंड तालुक्यातील कानगाव येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी (दि. 2) सकाळी साडेअकरा वाजता घडला.

उपशिक्षक नवनाथ भानुदास काळे (वय 51, रा. कानगाव, ता. दौंड) यांनी याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष उद्धव महाडिक (रा. कानगाव, ता. दौंड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानगाव येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्टाफरूममध्ये बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता आरोपी संतोष महाडिक आला. फिर्यादी यांचे सहकारी शिक्षक शशिकांत शिवाजी शिंदे यांना एकेरी भाषेत ‘तू माझ्या मुलाचा निकाल कधी देणार आहेस’ असे म्हटले.

त्यावेळी फिर्यादी तिथे गेले. ‘तुम्ही शिक्षकांशी व्यवस्थित बोला. तुमची काय अडचण आहे ती बसून सांगा’ असे फिर्यादी यांनी आरोपीला समजावले. त्यावर ‘तू मध्ये बोलणारा कोण. तुम्ही इथे कसे काम करता तेच बघतो’ असे म्हणत आरोपी फिर्यादी यांना मारण्यासाठी अंगावर धावून आला. शिवीगाळ करून मारण्यासाठी खुर्ची घेतली. शाळेची कागदपत्रे फेकून दिली. फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात आरोपीने अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यवत पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button