Uncategorized

सासवड येथे बँकेची फसवणूक करणा-या अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल

पुणे l प्रतिनिधी

एटीएम मधून पैसे मिळाले असतानाही एका व्यक्तीने पैसे न मिळाल्याची तक्रार करून बँकेला तब्बल सात लाखांचा गंडा घातला आहे. हा प्रकार एसबीआय बँकेच्या सासवड शाखेत 2 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत घडला आहे.

कर्मवीर तकदीर चव्हाण (वय 31, रा. को-हाळे खुर्द, ता. बारामती) यांनी याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड येथील एसबीआय बँकेच्या एटीएम मधून एका व्यक्तीने पैसे काढले. त्याला पैसे मिळाले. तरीही त्याने एटीएम मधून पैसे न मिळाल्याची बँकेकडे तक्रार केली. हा प्रकार त्याने 2 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत वारंवार करून एसबीआय बँकेची आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सात लाख सहा हजार 700 रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सासवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button