breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

चित्रपटाच्या चित्रिकारणासाठी चित्रपट महामंडळाकडून नियमावली जाहीर

मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यांसाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठीची नियमावली नुकतीच जाहिर करण्यात आली आहे.

निर्माते, तंत्रज्ञ, कलावंत, कामगार व चित्रपट क्षेत्राचे विविध सेवा पुरवठादार यांचेसाठी महत्तवाचे..

*कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे. आपण चित्रीकरण करताना विशेष काळजी घेवूनच चित्रीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

* जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांची लेखी परवानगी घेवूनच चित्रीकरण करावे.

* चित्रीकरण स्थळी जेवढी शक्य आहे तेवढी कमी टीम ठेवावी.

* सर्वांनी सोशल डिस्ट्नसिंग पाळावे.

* सेटवर सँनिटायझर, टेम्परेचर गन, ऑक्सिमिटर असणे आवश्यक आहे. तसेच याबाबतीत प्रत्येकाची रोज लेखी नोंद ठेवणे आवश्यक आहे.

* आपल्या युनिट मधील कोणाचे जवळचे, शेजारी कोरोना रुग्ण असतील तर संबंधित व्यक्तीची कोरोना चाचणी करुन रिपोर्ट जवळ बाळगावा.

* जास्त दिवस शूटिंग असेल तर सगळ्यांची कोरोना चाचणी करुन घेणे बंधनकारक आहे.

* शूटिंग साहित्य वरचेवर सँनिटाइज करणे आवश्यक आहे

* तंत्रज्ञ, कामगार वर्गाने हँड ग्लोव्हज, फेस शिल्ड वापरावी.

* चहापाणी, नाष्टा, लंच, स्नँक्स व डिनर यासाठी यूज अँन्ड थ्रो परंतु पर्यावरण पूरक साहित्य वापरावे. शक्यतो पँकिंग लंच वा इतर खाद्यपदार्थ वापरावेत.

* अ.भा.म.चि.महामंडळाच्या भरारी पथकातील सदस्य पाहणी करण्याकरीता आले तर त्यांना सहकार्य करावे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button