breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

महाराष्ट्र प्रीमियर लीग साठी ऋतुराज गायकवाडवर लागली सर्वाधिक बोली!

पुणे : IPL नंतर आता महाराष्ट्र प्रीमियर लीगचे (MPL) आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या फ्रँचाईजींचा लिलाव शनिवारी ३ जून रोजी पार पडला. या लिलावात सहा संघाच्या फँचाईजीसाठी तब्बल ५७.८० कोटी रूपयांची बोली लागल्या. पुणे येथे झालेल्या लिलावात २० इच्छुकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील सर्वात महागडी बोली पुणे फँचाईजीसाठी लागली.

हेही वाचा – देशातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर, वाचा क्रमवारी..

महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL)

(संघमालक-फ्रेंचाइजी-बोली-आयकॉन)

प्रवीण मसाले – पुणे संघ – १४.८ कोटी रूपये – ऋतुराज गायकवाड

उद्योजक पुनीत बालन – कोल्हापूर संघ – ११ कोटी रूपये – केदार जाधव

ईगल इन्फ्रा – नाशिक संघ – ९.१० कोटी रूपये – राहुल त्रिपाठी

व्यंकटेश्वर – छत्रपती संभाजीनगर संघ – ८.७० कोटी रूपये – राजवर्धन हंगरगेकर

जेटसिंथेसिस इंडिया – रत्नागिरी संघ – ८.३० कोटी रूपये – अझीम काझी

कपिल सन्स – सोलापूर संघ – ७ कोटी रूपये – विकी ओस्तवाल

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button