breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पोलीस बंदोबस्तात खंडेवस्ती झोपडपट्टी पुनर्वसन सर्वेक्षण ; अधिकारी काय म्हणाले… पहा व्हीडिओ!

३०० लाभार्थींचे सर्वेक्षण पूर्ण : उर्वरित सर्वेक्षण ५ सप्टेबरला होणार

पिंपरी : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून भोसरी- खंडेवस्ती येथील झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यासाठी ३०० लाभार्थींचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, उर्वरित सर्वेक्षण दि. ५ सप्टेंबररोजी करण्यात येईल. कायदेशीर मार्गाने प्रक्रिया सुरू असताना, काही लोक जमाव करुन शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण करण्यात येत आहे, अशी माहिती झोपडपट्टी निर्मूलन पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.

भोसरी येथील खंडेवस्ती झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, काही नागरिक प्रकल्पाची माहिती पूर्ण न घेता प्रशासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून आज पोलीस बंदोबस्तामध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले.

दरम्यान, ही नागरिकांनी गोंधळ निर्माण केला. तसेच, गणेशोत्सव असल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होवू नये. याकरिता पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. दिवसभरात सुमारे ३०० झोपडीधारकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, पुढील सर्वेक्षण ५ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर म्हणाले की, खंडेवस्ती झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी अनेक रहिवासीयांचा उस्फुर्त प्रतिसाद आहे. शासन निर्णयाप्रमाणे खंडेवस्ती झोपडपट्टी पुनर्वसनासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये सुरुवातीलाच ७५ टक्क्यांहून अधिक नागरिकांची पसंती असल्याचे दिसून आले आहे. झोपडपट्टी पुनर्वसनातून नागरिकांना अधिकाधिक सोयीसुविधा पुरविण्यात येतात यातून त्यांचे जीवनमान उंचावते. याची कल्पना नागरिकांन घेतली पाहिजे.

प्रकल्पांर्गत ९२४ सदनिकांची निर्मिती होणार…

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत खंडेवस्ती, भोसरी येथील सुमारे ३ हजार नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत ९२४ सदनिकांची निर्मिती होणार आहे. लाभार्थी कुटुंबाचे सव्हेक्षणही अंतिम टप्प्यात आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अर्थात एसआरएच्या नियमावलीनुसार, लाभार्थी नागरिकांना ४२० चौरस फुटाचे घर देण्यात येणार आहे. यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर , व  भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण घेण्यात आले.

केवळ विरोधाला विरोध करू नका नाहक विरोध होत राहिला, तर  झोपडपट्टी पुनर्वसन होण्यासाठी अनेक पिढ्या न्यायालयात खेटे घालण्यात दमून जातील.  झोपडपट्टीधारकांनी कायदा समजून घेतला पाहिजे. नियमाप्रमाणे हक्काचे घर मिळत असताना, केवळ विरोध करण्यासाठी काहीलोक दिशाभूल करीत असतील, तर ते प्रकल्पासाठी हिताचे नाही.

राजेंद्र निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button