breaking-newsTOP Newsमुंबई

INS विक्रांत प्रकरणात सोमय्या पितापुत्रांना दिलासा, मात्र चौकशी राहणार सुरू

मुंबई । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

आयएनएस विक्रांत प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्यांना यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. जामीन अर्जाची याचिका निकाली काढली आहे. अटक करण्याआधी 72 तासांआधी सोमय्यांना सांगावे लागणार आहे. या घोटाळ्याबद्दल कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितलं. पण कोर्टाने पुन्हा एकदा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी समन्स बजावला आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलावर आयएनएस विक्रांत निधी गोळा प्रकरणामध्ये गंभीर आरोप केले होते. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलावर आयएनएस विक्रांत निधी गोळा प्रकरणामध्ये गंभीर आरोप केले होते.

पत्राचाळ प्रकरणामध्ये कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलावर आयएनएस विक्रांत निधी गोळा प्रकरणामध्ये गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी आज कोर्टाने सोमय्यांना दिलासा दिला. तूर्तास आर्थिक घोटाळा केल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत, असं मुंबई पोलिसांचं हायकोर्टात सबमिशन केले आहे. मात्र किरीट आणि नील सोमय्या यांना अटक करण्यापूर्वी 72 तासांची नोटीस द्यावे, असे आदेश हायकोर्टाने पोलिसांना दिले आहे. हे आदेश देत सोमय्यांची अटकपूर्व जामीन याचिका हायकोर्टानं निकाली काढली आहे.

परंतु, या प्रकरणी हायकोर्टाने आणखी एक समन्स सोमय्यांना बजावला आहे. मुंबई पोलिसांसमोर या प्रकरणात चौकशी करता हजर राहण्याचे नवं समन्स जारी करणार आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांची 17 ऑगस्टला तर नील सोमय्यांची 18 ऑगस्टला आयएनएस विक्रात प्रकरणात पुन्हा चौकशी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

किरीट सौमय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहीम राबवली होती. आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी यासाठी किरीट सौमय्यांनी पैसे जमा केले होतो. यासाठी त्यांनी पैसे जमा केले होते. पण जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नाहीत, अशी माहिती आरटीआयमध्ये उघड झाली. आरटीआय कार्यकर्ते उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून मागवली माहिती होती. यात असे कोणतेही पैसै मिळाले नसल्याचं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले.

या प्रकरणी माजी सैनिक बबन भीमराव भोसले यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे. किरीट सोमय्या, निल सोमय्या आणि त्यांचे इतर साथीदार याविरुद्ध अर्ज केला आहे. INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी, करोडोंचा अपहार केल्याचा आरोप केला आहे. 2013 मध्ये खासदार असताना निधी गोळा केल्याचा आरोप सोमय्यांवर करण्यात आळा आहे. किरीट सोमय्या यांनी राष्ट्राची आणि जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे किरीट आणि निल सोमय्या या पितापूत्रांसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी बबन भोसले यांनी केली आहे.

भारतीय नौदलातून निवृत्त करण्यात आलेली विमानवाहू युद्धनौका “आयएनएस विक्रांत’चा 60 कोटी रूपयांना लिलाव करण्यात आला. ‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेने 1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. 1961 मध्ये नौदलात दाखल झालेल्या “आयएनएस विक्रांत’ची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच असमर्थता दर्शविली होती. ‘आयएनएस विक्रांत’चा लिलाव न करता या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. लिलाव प्रक्रियेत आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 60 कोटींच्या मोबदल्यात ‘आयएनएस विक्रांत’ खरेदी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button