breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांना दिलासा; १० जानेवारीपासून नवे नियम लागू

UPI Transactions Rules : ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आता तुमची UPI पेमेंट मर्यादा १ लाख रूपयांवरून ५ लाख रूपये करण्यात येणार आहे. हा नवा नियम १० जानेवारी पासून लागू होणार आहे.

पेमेंट १ लाख रुपयांवरुन ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आले: NPCI ने हॉस्पिटल आणि शाळेच्या संस्थांसारख्या अत्यावश्यक संस्थांच्या पेमेंटसाठी एकावेळी ५ लाख रुपयांच्या ऑनलाइन पेमेंटमध्ये सूट दिली आहे. हा नवा नियम १० जानेवारीपासून लागू होणार आहे. एनपीसीआयने बँका आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना अॅडव्हायजरी जारी केली आहे.

हेही वाचा –  ‘रामराज्य’ हे आमचे स्वप्न; मंदिर ही आमची अस्मिता : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भावना

पेमेंट मर्यादेत वाढ : NPCI ने व्यापाऱ्यांसाठी १ लाख ते ५ लाख रुपयांची पेमेंट मर्यादा लागू केली आहे. नॅशनल पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया (NPCI)द्वारे पेमेंटची मर्यादा दिवसासाठी १ लाख रुपये इतकी ठेवली आहे. मागच्या पतधोरणाच्या बैठकीत RBI ने ५ लाख रुपये पेमेंट मर्यादा दिली. यामुळे Paytm, Google Pay आणि PhonePe सारख्या पेमेंट अॅप्सना फायदा होईल.

UPI पेमेंटमध्ये भारत अग्रेसर : २०२३ मध्ये UPI पेमेंटच्या बाबतीत भारताने १०० अब्जाचा आकडा पार केला आहे. या संपूर्ण वर्षात ११८ अब्ज रुपयांचे UPI पेमेंट करण्यात आले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button