breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

रिलायन्स जिओ अ‍ॅमेझॉनला भारी पडणार; व्हॉट्सअ‍ॅपसोबत करार

मुंबई | टीम ऑनलाइन
लाॅकडाऊन काळात व्यापाराच्या सर्वच व्याख्या बदलून गेल्या आहेत. डिजिटलायझेशनला महत्त्व आले आहे. आता प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन होऊ पाहत आहे. त्यातच आता भारतात कुठल्याही सामानाच्या डिलिव्हरीसाठी काही दिवस वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण ती अवघ्या काही तासांमध्येच तुमच्यापर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. त्यासाठी रिलायन्स जिओकडून व्हॉट्सअ‍ॅपसोबत एक करार करण्यात आला आहे.

तुम्ही एखादी वस्तू इतर ऑनलाईन साईटवरून बूक केली तर ती घरी यायला काही दिवसांचा वेळ लागतो, मात्र या करारानंतर रिलायन्स स्टोअरवरून बूक केल्यास ती अवघ्या काही तासांमध्ये तुम्हाला मिळू शकते. म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीज आता टॉप ऑनलाईन सेलर असलेल्या अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे.

रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्मचे संचालक आकाश अंबानी यांनी या कराराबाबत सांगितले, इंटरनेट क्षेत्रात या आधीच जीओमुळे क्रांती घडून आली आहे. आता याच नेटवर्कचा उपयोग करून देशातील छोटे-मोठे व्यापारी जोडण्याचा आमचा उद्देश आहे. आजच्या डिजिटल युगात किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहेत. ते भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यामुळे काळाच्या ओघात या व्यापाऱ्यांनीदेखील बदलले पाहिजे. त्यांनीदेखील डिजिटल व्हावे असे आम्हाला वाटते, त्यामुळे या व्यापाऱ्यांना अशीच एक संधी रिलायन्स जिओकडून येणाऱ्या काळात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये त्यांचादेखील मोठ्याप्रमाणात फायदा होऊ शकतो. तसेच जिओचे देशभरात मोठ-मोठे मार्केट आहेत. त्यांच्या माध्यमातूनदेखील ग्राहकांना वस्तू पुरावल्या जाऊ शकतात, असे आकाश यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button